‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ ठाण्यात

By Admin | Published: July 17, 2014 01:25 AM2014-07-17T01:25:31+5:302014-07-17T01:25:31+5:30

हरवलेल्या मुलांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ची निर्मिती केली आहे

'Child Protection Unit' in Thane | ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ ठाण्यात

‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ ठाण्यात

googlenewsNext

ठाणे : हरवलेल्या मुलांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ची निर्मिती केली आहे. अशा प्रकारे पोलीस दलात युनिटची स्थापना करणारे शहर पोलीस दल ठाणे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिलेच दल ठरणार आहे. यामुळे त्या मुलांच्या सुरक्षिततेबरोबर त्यांची होणारी पिळवणूकही कमी होण्यास मदत मिळेल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ची निर्मिती शहरात करण्यात आली आहे. जिल्'ातील हरवलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी यासाठी पोलिसांना मदतीचा हातही पुढे केला आहे. या युनिटमध्ये आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील १५ पोलीस अधिकारी आणि ३० कर्मचाऱ्यांची एक फौज तयार केली आहे. त्यांना तज्ज्ञांद्वारे विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा घेण्यात आली. या प्रशिक्षणात हरवलेल्या मुलांचा शोध कसा करावा तसेच सापडलेल्या मुलांचे समुपदेशन करून त्यांचे घर सोडून जाण्यामागील कारण काय, हे जाणून घेतले जाणार आहे. काही वेळा ही मुले लवकर बोलण्यास तयार होत नाहीत. त्यांना क से बोलते करायचे, त्याबाबतही प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांच्या घरातील वातावरणही जाणून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचेही त्या वेळी समुपदेशन केले जाणार आहे. युनिटची जागा प्रस्तावित असून तेथे समुपदेशन केंद्र, सभागृह, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने तसेच कक्षांमध्ये काम करणाऱ्या पोलिसांसाठी बैठक व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Child Protection Unit' in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.