Join us

वैमनस्यातून मुलाला लिफ्टमध्ये कोंडले

By admin | Published: August 28, 2016 4:10 AM

शेजाऱ्याशी असलेल्या वादातून त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये काही काळ कोंडून ठेवण्याचा प्रकार मानखुर्दमधील नवीन म्हाडा वसाहतीत समोर आला आहे.

मुंबई : शेजाऱ्याशी असलेल्या वादातून त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये काही काळ कोंडून ठेवण्याचा प्रकार मानखुर्दमधील नवीन म्हाडा वसाहतीत समोर आला आहे. बिल्डिंगमधील इतरांनी तातडीने लिफ्ट सुरू केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सुलतान खान (४५) याच्याविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तोतया पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. मानखुर्दच्या नवीन म्हाडा वसाहत इमारत क्रमांक ८९च्या सातव्या मजल्यावर रफी सरनोबत गेल्या १० वर्षांपासून राहतात. खान याच्याशी त्यांचे काही कारणावरून भांडण झाले होते. त्या रागातून त्याने हा प्रकार केला. सरनोबत दाम्पत्य कामावर गेले असताना त्यांचा पाच वर्षांचा मुलगा अरमान याला त्यांच्या घरात काम करणारी महिला शाळेत सोडण्यासाठी घेऊन जात होती. हे दोघेही लिफ्टमध्ये असताना सुलतान खानने लिफ्ट बंद केल्याने ते अडकले. आरडाओरड्यामुळे इतर फ्लॅटधारकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने लिफ्ट सुरू केली. सरनोबत यांना हा प्रकार समजताच त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)