आईसाठी मुलांनी केले किडनीदान; प्रत्यारोपणाचा भारत-टांझानियातील रुग्णांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 06:55 AM2023-12-09T06:55:21+5:302023-12-09T06:55:40+5:30

, विलेपार्ल्यातील मॅक्स नानावटी आणि चेंबूरमधील सुश्रूत या दोन रुग्णालयांत नुकतीच अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.

Children donate kidney for mother; 90 transplants through the swap registry | आईसाठी मुलांनी केले किडनीदान; प्रत्यारोपणाचा भारत-टांझानियातील रुग्णांना फायदा

आईसाठी मुलांनी केले किडनीदान; प्रत्यारोपणाचा भारत-टांझानियातील रुग्णांना फायदा

मुंबई : किडनीदानाची अनेक उदाहरणे आपण आतापर्यंत ऐकली आणि पाहिली आहेत. साधारणत: रक्ताच्या नात्यातील व्यक्ती कुटुंबात ज्या व्यक्तीची किडनी निकामी झाली आहे त्यास किडनी देतात. मात्र, कुटुंबातील सदस्याची किडनी जुळत नसल्यास बाहेरचा पर्याय शोधावा लागतो. अशाच प्रकारचे किडनी अदलाबदल करण्याचे सत्कार्य दोन देशांतील कुटुंबांनी केले आहे. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असे संबोधले जाते. 

विलेपार्ल्यातील मॅक्स नानावटी आणि चेंबूरमधील सुश्रूत या दोन रुग्णालयांत नुकतीच अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. टांझानियातील झाचरिया आणि भारतातील चैनानी ही दोन कुटुंबे याचे लाभार्थी ठरले. फ्रेड झाचरिया यांच्या आई फ्रान्सिका यांना शीला चैनानी यांच्या मुलाने आदित्यने किडनी दान केले, तर फ्रेड झाचरिया यांनी शीला यांना किडनी दिली. वैद्यकीय गुंतागुंत तसेच रक्तगट न जुळणे या दोन कारणांमुळे या दोन्ही कुुटुंबांनी हा मार्ग पत्करला. 

स्वॅप रजिस्ट्रीद्वारे ९० प्रत्यारोपण
ज्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरातील किडनी निकामी झालेल्या रुग्णांना किडनी द्यायची आहे; मात्र जुळत नाही, या अशा कुटुंबातील सदस्य चेंबूर येथील अपेक्स स्वॅप ट्रान्सप्लांट रजिस्ट्री (ऍस्ट्रा) येथे नावनोंदणी करू शकतात. त्यानंतर यामध्ये अशी दोन कुटुंब शोधली जातात, ज्यामध्ये अवयव देणाऱ्या दात्याच्या किडनीची अदलाबदल करून स्वॅप किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकते की नाही, याची पडताळणी केली जाते. वैद्यकीय चाचण्या करून सगळे व्यवस्थित होऊ शकेल, असे दिसले की मग त्या दोन कुटुबांमध्ये स्वॅप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. या रजिस्ट्रीद्वारे गेल्या १२ वर्षांत ८४ प्रत्यारोपण केले गेले आहे. 

देशातील अशा पद्धतीची पहिली रजिस्ट्री असल्याचे या रजिस्ट्रीचे समन्वयक डॉ. गणेश सानप यांनी सांगतिले. तसेच सध्याच्या घडीला रुग्णालय वैयक्तिक पातळीवर अशा रुग्णांची नोंद ठेवत आहे.

नेमके झाले काय?
फ्रान्सिस्का झाचरिया यांचा रक्तगट होता ‘ए’ तर मुलगा फ्रेडीचा रक्तगट ‘बी’ होता. अशा परिस्थितीत किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर ती यशस्वी ठरण्याची शक्यता कमी होती. त्याचप्रमाणे शीला चैनानी (बी ) त्यांचा मुलगा आदित्य (ए ) या कुटुंबामध्ये तीच परिस्थिती होती.
भिन्न जुळणीच्या या दोन्ही कुटुंबांनी परस्परांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, असे मॅक्स नानावटी हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ज्ञ डॉ. जतीन कोठारी यांनी सांगितले. 

मला अभिमान आमच्या रुग्णालयात अशा पद्धतीची किडनी स्वॅप रजिस्ट्री आहे. ज्याच्यामुळे आम्ही स्वॅप किडनी पद्धतीचा अवलंब करून दोन्ही कुटुंबांना मदत करू शकतो.  याचा फायदा केवळ देशातील नव्हे तर देशाबाहेरील रुग्णांनाही होत आहे. त्यामुळे या स्वॅप रजिस्ट्रीबाबत जनजागृती होणे गरजेची आहे. शेवटच्या टप्प्यातील किडनी आजार आणि डायलेसिसवरील रुगांसाठी ही रजिस्ट्री एक वरदान आहे. - सोनल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुश्रूत हॉस्पिटल

या कुटुंबांत स्वॅप किडनी प्रत्यारोपण

झाचरिया कुटुंब 

आई फ्रान्सिका झाचरिया - मुलगा आदित्य चैनानी 

मुलगा फ्रेड झाचरिया - आई शीला चैनानी

Web Title: Children donate kidney for mother; 90 transplants through the swap registry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.