कर्ज फेडण्यासाठी लहान मुलांनी घर सोडले; रेल्वेमध्ये शिरता न आल्याने फसला बेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:10 AM2018-11-18T05:10:42+5:302018-11-18T05:11:08+5:30

वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 Children leave home to pay off debts; If you do not get into the train | कर्ज फेडण्यासाठी लहान मुलांनी घर सोडले; रेल्वेमध्ये शिरता न आल्याने फसला बेत

कर्ज फेडण्यासाठी लहान मुलांनी घर सोडले; रेल्वेमध्ये शिरता न आल्याने फसला बेत

Next

- शेखर साळवे

मुंबई : वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
साकीनाक्यामधील मुरारजीनगर येथे ही मुले राहतात़ याच परिसरातील समता विद्यालयामध्ये ती शिक्षण घेत आहेत. गोलू अनिल शाहू (९) इयत्ता ३ री, लकी विनोद पांडे (८) इयत्ता ५वी, कमलेश चंदकिशोर कामत (११) इयत्ता ६वी आणि कुंदन चंदकिशोर कामत (१२) इयत्ता ८वी या चिमूरड्यांची नावे आहेत़
गुरुवारी सायंकाळी ही चारही अल्पवयीन मुले परिसरातच खेळत असताना, गोलूने आपल्या मावशीच्या लग्नाला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार, सकाळी या सर्व लहानग्यांनी दोन-दोन जोडी कपडे घेऊन बेस्ट बस स्थानकातून बस पकडून लोकमान्य टिळक टर्मिनस गाठले. तेथे पोहोचून बिहारला जाण्यासाठी जाणाऱ्या ट्रेनची विचारपूस केली. त्यानुसार, ते फलाट क्रमांक ५वर उभ्या असलेल्या दरभंगा एक्स्प्रेस या ट्रेनमध्ये जाण्यासाठी निघाले. मात्र, या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे या ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्याकारणाने या लहानग्यांना ट्रेनमध्ये शिरताच आले नाही. त्यामुळे काय करावे, ते त्यांना समजत नव्हते.
हा सर्व प्रकार स्नेह सदन या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते कमलाकर शिंदे आणि जयश्री खरात यांनी पहिला. त्यांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली़ ही मुले घरातून पळून आल्याचे त्यांना समजले. टर्मिनसवर असलेल्या पोलिसांसमोर या मुलांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ काही कपडे सापडले़

आम्ही खूप पैसे कमवून मोठे घर घेऊ
हा सर्व प्रकार स्नेह सदन या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते कमलाकर शिंदे आणि जयश्री खरात यांनी पहिला. त्यांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली़ ही मुले घरातून पळून आल्याचे त्यांना समजले. टर्मिनसवर असलेल्या या मुलांची झडती घेतली़
कर्ज फेडण्यासाठी कामाच्या शोधत पळून जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच कुटुंबीयांनी आमचा शोध घेऊ नये, काळजी करू नये, आम्ही खूप शिकून पैसा कमावून घरी येऊ आणि आपल्याला राहण्यासाठी मोठे घर घेऊ, असे उल्लेख मुलांच्या चिठीत लिहिले होते़

Web Title:  Children leave home to pay off debts; If you do not get into the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई