मुलांनी राजकारणात न येता 'हे' करावं असं वाटायचं; नारायण राणेंची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:08 PM2023-05-07T14:08:30+5:302023-05-07T14:09:53+5:30

नारायण राणेंनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आणि राजकारणात झालेली एंट्री. याशिवाय पहिली निवडणूक कशी जिंकली,

Children wanted to do 'this' without joining politics; Narayan Rane's 'Mann Ki Baat' | मुलांनी राजकारणात न येता 'हे' करावं असं वाटायचं; नारायण राणेंची 'मन की बात'

मुलांनी राजकारणात न येता 'हे' करावं असं वाटायचं; नारायण राणेंची 'मन की बात'

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांची सातत्याने चर्चा असते. शिवसेना पक्ष सोडल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर नेहमीच निशाणा साधतात. तर, त्यांची दोन्ही मुलेही शिवसेनेवर टीका करत असतात. बाळासाहेब ठाकरे आजही आपले दैवत आहे, असेही ते म्हणतात. मात्र, उद्धव ठाकरेंवर टीका करायची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळेच, कोकणासह महाराष्ट्रातील राजकारणात राणेंचा वेगळात पॅटर्न दिसून येतो. मात्र, आपल्या मुलांना राजकारणात येऊ नये, अशी नारायण राणेंची इच्छा होती. स्वत: राणेंनी याबाबत भाष्य केलं आहे. 

नारायण राणेंनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आणि राजकारणात झालेली एंट्री. याशिवाय पहिली निवडणूक कशी जिंकली, असा राजकीय प्रवास एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितला. यावेळी, आपल्या दोन्ही मुलांबाबतही त्यांनी भाष्य केलं. मुलांनी स्वत:ला सिद्ध केलंय, ते कर्तृत्ववान आहेत. मात्र, दोघेही ओघाओघाने राजकारणात आलेत, असेही राणेंनी स्पष्ट केले. 

माझ्या मुलांनी राजकारणात यावं असं मला वाटत नव्हतं. ते ओघाओघाने आलेत. त्यांनी आपला उद्योग सांभाळावा, आपला जो उद्योग आहे, तो वाढवावा, असंच वाटायचं. पण, ते स्वत:हून राजकारणात आले, असे म्हणत नारायण राणेंनी मुलांच्या राजकीय प्रवेशावर भाष्य केलं. 
 
मी राजकारणात आलो, यशस्वीही झालो. पण, आता दिवसेंदिवस राजकारण बदल आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा याचं मुल्यमान पदं देताना होत नाही. मी अनेक गोष्टी सहन केल्या असतील. पण, आता मुलांना त्या सहन कराव्या लागू नयेत, म्हणून त्यांनी राजकारणात येऊ नये, असे वाटायचं, असे कारणही राणेंनी सांगितलं. 

मी लंडनहून मुंबईला आलो

दरम्यान, मी २००६ पर्यंत लंडनमध्येच होतो, त्यामुळे मला राजकारणात यायची इच्छा नव्हती. मी धाडस करुन आईला प्रश्न केला की मला लंडनमध्येच राहणं शक्य आहे का, पण अर्धाच विसा घरातून मिळाला पूर्ण मिळू शकला नाही. त्यामुळे, लंडनहून मुंबईला यावं लागलं. मी मुंबईत आलो तेव्हा वडिलांनी शिवसेना सोडली होती, त्यामुळे त्यांच्यासोबत असणे गरजेचं होतं. त्यातूनच, परिस्थिीतीनुरुप मी राजकारण येत गेलो. महाराष्ट्रात फिरलो आणि पहिली निवडणूक लढवली, असे आमदार नितेश राणेंनी सांगितले.  
 

Web Title: Children wanted to do 'this' without joining politics; Narayan Rane's 'Mann Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.