घारापुरी बेटावर उभारणार बालोद्यान!

By admin | Published: December 26, 2016 07:09 AM2016-12-26T07:09:14+5:302016-12-26T07:09:14+5:30

घारापुरी बेटावर पर्यटनासाठी येणाऱ्या आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी आणि पर्यटनाचाही आनंद लुटता यावा यासाठी वनविभागाने

Children will build on Gharapuri Island! | घारापुरी बेटावर उभारणार बालोद्यान!

घारापुरी बेटावर उभारणार बालोद्यान!

Next

उरण : घारापुरी बेटावर पर्यटनासाठी येणाऱ्या आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी आणि पर्यटनाचाही आनंद लुटता यावा यासाठी वनविभागाने बालोद्यान उभारण्याची योजना आखली आहे. वनविभागाच्या जुन्या नर्सरीच्या तीन एकर क्षेत्रात २५ लाख खर्चाची योजना पर्यटक विकास निधीतून आणि पर्यटन विभागाच्या मदतीने टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. गायकवाड यांनी दिली.
घारापुरी बेटावर वनविभागाची नर्सरी होती. निसर्गरम्य वातावरणात निवांत बसण्याची सोय असलेल्या या नर्सरीचे आकर्षण याआधी सर्वच पर्यटकांना होते. या आकर्षणातून वनविभागाच्या या नर्सरीत पर्यटकांची नेहमीच गर्दी असायची. लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या शेजारीच असलेल्या नर्सरीमध्ये अनेक प्रकारची आकर्षक झाडे, झुडपे, वेलीही होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून या घारापुरी बेटावर सध्या वनविभागाच्या असलेल्या नर्सरीची पार दुरवस्था झाली आणि नर्सरीची रयाच गेली. त्यामुळे पर्यटकही या दुरवस्थेतील नर्सरीकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यातच निधीची चणचण भासत असल्याने वनविभागाकडूनही नर्सरीची डागडुजी करण्यामध्ये रस दाखविला जात नाही. त्यामुळे एकेकाळी पर्यटकांसाठी खास आकर्षण असलेली नर्सरी मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. आता मात्र वनविभागानेच पर्यटकांसाठी नर्सरीचे बालोद्यानात रूपांतर करण्याची तयारी सुरु के ली आहे. नर्सरीच्या तीन एक क्षेत्रावर सभोवार तारेचे कुंपण घालून बंदिस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बंदिस्त कामानंतर नर्सरीचे बालोद्यानात रूपांतर करण्याची योजना वनविभागाने आखली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या लहान मुलांना मौजमजा करण्यासाठी घसरगुंडी, झुले, सी-सॉ इतर प्रकारातील आकर्षित खेळाचे साहित्य आणि खेळणी बालोद्यानात बसविण्यात येणार आहे. वृद्धांनाही विरंगुळा वाटावा आणि त्यांना पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी उपयुक्त साधने बसविण्यात येणार आहेत. यासाठी वनविभागाने आराखडाही तयार केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Children will build on Gharapuri Island!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.