ग्राहकांच्या खिशाला झोंबणार मिरच्या...!
By admin | Published: April 24, 2015 10:36 PM2015-04-24T22:36:49+5:302015-04-24T22:36:49+5:30
उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची वर्षाचा मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र मिरचीचे दर वाढल्याने यंदाचा मसाला ग्राहकांसाठी चांगलाच तिखट झाला आहे.
अरुणकुमार मेहेत्रे, कळंबोली
उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची वर्षाचा मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र मिरचीचे दर वाढल्याने यंदाचा मसाला ग्राहकांसाठी चांगलाच तिखट झाला आहे.
नवीन पनवेल येथील हरि ओम मार्केटमधील मसाला दुकानावर खांदा कॉलनी, कळंबोली, नवीन पनवेल, विचूंबे, सुकापूर येथील मिरचीच्या, मसाल्यांच्या दुकानांवर सकाळ-संध्याकाळ चांगलीच गर्दी पाहायला मिळते. मसाल्यासाठी ही मिरची कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून मागविली जात असल्याची माहिती मसाला दुकानदारांनी दिली. कर्नाटकातून बेडगी, कश्मिरी तर आंध्रप्रदेशातून गुंटूर आणि महाराष्ट्रातून तेजा म्हणजेच लवंगी मिरचीला चांगलीच मागणी असते. आंध्राच्या रेशमपट्टी मिरचीच्या कमी तिखटपणामुळे गुजरातमध्ये तिला मोठी मागणी असते, तर रायगड जिल्ह्यात आगरी-कोळी समाज तिखट मसाला वापरतो. त्यामुळे बेडगी, पांडी, काश्मिरी, ढेबी, लवंगी मिरचीला सर्वाधिक मागणी आहे.
गेल्यावर्षीच्या आणि आजच्या मिरची भावात ३० ते ४० रु पयांचा फरक असून एक किलो मिरची पूड व वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी १००० रु पये सध्या मोजावे लागत आहेत. तर यावर्षी मिरची महागल्याने १२०० रुपयांपर्यंत मिरची पूड बनवून मिळते. त्यामुळे यंदाचा मसाला चांगलाच खिशाला झोंबणारा आहे. मसाला दुकानातून मिरची विकत घेण्यासाठी ३० ते ४०रु. अधिक देऊन त्यातही मिरचीचे देठ काढून घेण्यासाठी २० रु पये अधिक मोजावे लागतात. बाहेरील मार्केटमधून मिरचीची आवक कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.