Join us

मुंबई शहरात चिमुकले अजूनही असुरक्षितच

By admin | Published: August 14, 2016 3:45 AM

चिमुकल्यांचा आक्रोश वाढत असल्याने देशाचे भविष्य अजूनही असुरक्षित असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. गेल्या सात महिन्यांत

मुंबई : चिमुकल्यांचा आक्रोश वाढत असल्याने देशाचे भविष्य अजूनही असुरक्षित असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. गेल्या सात महिन्यांत २४३ अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या, तर ६५६ मुलींचे अपहरण झाल्याची नोंद आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लहान मुलांंचे अपहरण, लंैगिक अत्याचार अशा दर दिवसाला दोन ते तीन घटना दाखल होत आहेत. या वर्षीच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार २४ जुलैपर्यंत लहान मुलींवर बलात्काराचे २४३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अवघ्या २२१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर अपहरण झालेल्या ६५६ मुलींपैकी अवघ्या ४२९ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुले हरविल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार अल्पवयीन मुले हरविल्यास पोलीस अपहरणाचे गुन्हे दाखल करतात, मात्र न्यायालयाने ज्या गांभीर्याने गुन्ह्यांंचा तपास व्हावा म्हणून हे आदेश दिले आहेत. त्या पद्धतीने तपास होताना दिसत नसल्याचे वास्तव गुन्ह्यांंच्या उकलीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)पालकांनो काळजी घ्या...खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना जास्त आहेत. त्यात जवळच्या व्यक्तींकडूनच ही चिमुरडी अत्याचाराचे बळी ठरत असल्याचेही तपासात समोर आले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनोळखी व्यक्तींशी बोलणे टाळणे, चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव करून देणे, शिवाय मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासाठी होतो वापर..अपहरण केलेल्या बालकांंचा उपयोग लंैगिक अत्याचाराबरोबर, अनैसर्गिक संभोग, निर्यातीकरता, चोरी, विवाह, उंट शर्यत, भीक मागणे, खंडणी, गुलामगिरी अशा विविध कारणांसाठी केला जातो.पॉस्को कायदालहान मुलांंचे होणारे लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार यापासून त्यांंची सुरक्षा करण्यासाठी आणि संरक्षणासाठी जून २०१२ मध्ये पॉस्को कायदा अस्तित्वात आला.या वर्षीच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार २४ जुलैपर्यंत लहान मुलींवर बलात्काराचे २४३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अवघ्या २२१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.