Join us

ट्रान्सहार्बरसाठी चीनचे सहकार्य - मुख्यमंत्री

By admin | Published: May 21, 2015 2:02 AM

दीर्घ काळापासून रखडलेल्या शिवडी-न्हावा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पासाठी चीनचे सरकार वित्तीय मदत आणि प्रकल्प उभारणीसाठीही सहकार्य करणार आहे,

मुंबई : दीर्घ काळापासून रखडलेल्या शिवडी-न्हावा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पासाठी चीनचे सरकार वित्तीय मदत आणि प्रकल्प उभारणीसाठीही सहकार्य करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण करण्याची तयारी चीन सरकारच्या पायाभूत सुविधा कंपनीने दाखविली आहे. या कंपनीने चीनमध्ये ४२ किलोमीटरचा ट्रान्स-हार्बर लिंक साडेतीन वर्षांत उभारलेला आहे. एमटीएचएलसाठी २ ते ४ टक्के व्याजदराने वित्त पुरवठा करण्याची तयारी चीन सरकारने दर्शविली आहे. अशाच प्रकारचा वित्त पुरवठा अन्य प्रकल्पांसाठीही घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवडी-न्हावा ट्रान्स हार्बर लिंकला १९९६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. आधी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असलेला २२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प नंतर एमएमआरडीएकडे देण्यात आला. मूळ ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची अंदाजे किंमत आता ९ हजार ६३० कोटींवर गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)च्‘अ‍ॅपल’ची उत्पादक भागिदारी कंपनी असलेल्या फॉक्सकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आपण चीन भेटीत चर्चा केली. च्या कंपनीने आयफोनचे उत्पादन महाराष्ट्रात करण्यासाठी गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे.