Join us  

प्रचारसभांमध्ये चायनीज तलवारींची चलती

By admin | Published: October 12, 2014 1:04 AM

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांकडून मोठमोठय़ा सभांमध्ये त्यांचा आवजरून उल्लेख होताना दिसत आहे.

पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांकडून मोठमोठय़ा सभांमध्ये त्यांचा आवजरून उल्लेख होताना दिसत आहे. प्रचारासाठी अखेरचे दोन-तीन दिवसच शिल्लक राहिल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्यात येत आहे. या नेत्यांना भेट म्हणून बहुतांश वेळा ‘तलवार’ देण्याची प्रथा रुढ आहे. त्यासाठी प्रचाराच्या इतर साहित्याप्रमाणो चायनामेड तलवारीही बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत.
निवडणुक काळातील तलवारींची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. सध्या बाजारात विविध प्रकारच्या तलवारी उपलब्ध असून यात ‘भवानी’ आणि ‘जोधपूरी’ तलवारींना पसंती आहे. या तलवारी प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा राज्यात तर महाराष्ट्रातील नांदेड जिल्हय़ात बनविल्या जातात. मात्र त्या तुलनेने महाग असल्याने चायनामेड तलवारींना राजकीय पक्षांकडून मागणी असल्याचे मुंबईतील विक्रेते अशोक सिंग सांगतात. 
जेव्हा ग्राहक तलवार अथवा कोणतेही शस्त्र खरेदी करण्यासाठी येतो, त्याची नोंद असणो बंधनकारक आहे. हा नियम राजकीय पक्षांनाही लागू आहे. सध्या पक्षांकडून 3 फूट लांबीची आणि आकर्षक मूठ असलेल्या तलवारींना मोठी मागणी आहे. ही तलवार 5,क्क्क् रुपयांर्पयत उपलब्ध बाजारात आहे. मात्र चिनी बनावटीची याच आकाराची तलवार निम्म्या किमतीत उपलब्ध असल्याचे सिंग यांनी सांगितले. दरम्यान तलवार भेट देणो ही आपली पूर्वापार परंपरा आहे. त्यामुळे निवडणूक काळात तलवार भेटवस्तू म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. मात्र या तलवारीची किंमत उमेदवाराच्या निवडणुक खर्चातून होणो आवश्यक असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)