Join us

‘चिंतामणी’ची एक झलक मिळण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:16 AM

चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतकोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील गणेशभक्तांनी हजेरी लावली होती.

मुंबई : चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे शतकोत्सवी वर्ष असल्याने रविवारी पार पडलेल्या आगमन सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. बाप्पाची एक झलक मिळण्यासाठी उपस्थितांनी केलेली धडपड आणि अतिउत्साह हा उपद्रव करणारा ठरल्याचे चित्र दिसून आले. आगमन सोहळ्याच्या अंतिम टप्प्यात लालबाग परिसरात चपलांचा खच, दुभाजकांवरील झाडांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि हुल्लडबाजी करणारी तरुणाई दिसून आली.दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी हजेरी लावली. या वेळी चिंतामणी मंडळाचे टी-शर्ट परिधान केलेले तरुण-तरुणींचे ग्रुप्स चिंचपोकळी, करी रोड स्थानकांवर मोठमोठ्या आवाजात किंचाळत- ओरडत मिरवणुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. चिंचपोकळीचा पूल धोकादायक असल्याने तेथे गर्दी करू नये, असे आदेश देऊनही मोठ्या प्रमाणावर तरुणाई या पुलावरच ठाण मांडून बसलेली दिसून आली. पोलिसांनी पुढाकार घेऊन या गर्दीवर नियंत्रण मिळविले, दुर्घटनेचा धोका वेळीच टळल्याचे दिसून आले.

पालिकेने सुचविलेल्या पर्यायी मार्गाला नकार देत चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर आगमन सोहळ्याचे व्यवस्थापन केले होते. आगमन सोहळ्यादरम्यान केवळ दुभाजकांवर मंडळाचे कार्यकर्ते नजरेस पडले, ही संख्या हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. गर्दीचे व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी दुचाकी पार्क केलेल्या दिसून आल्या, बाप्पाची झलक दिसताच रेटारेटी करणाऱ्या तरुणाईमुळे अनेकांना मुका मार बसला. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना अधिक त्रास झाल्याचे दिसले. या आगमन सोहळ्यादरम्यान मंडळाच्या वतीने कुठलेही आपत्कालीन वैद्यकीय उपचार पथकाची सेवा कुठेही नसल्याचे दिसून आले...अन् ‘तो’ लोकलसमोरच पडलाआगमन सोहळ्यानंतर सायंकाळी चिंचपोकळी स्थानकावर परतणाºया गणेशभक्तांची गर्दी होती. या वेळी या गर्दीवर नियंत्रणासाठी स्थानकासह पुलावरही पोलीस तैनात होते. त्या वेळी सीएसटी स्थानकाच्या दिशेने जाणारी लोकल स्थानकात आली, अन त्यामध्ये चढण्यासाठी स्थानकावर एकच गोंधळ उडाला. स्थानकाच्या सुरुवातीला उभ्या असणाºया पोलिसांची नजर चुकवून दोन तरुणांनी रुळांवर उडी मारली.

लोकल दुसºया बाजूने पकडण्याच्या प्रयत्नात असताना एक तरुण थेट लोकलसमोरच पडला. तर दुसरा लोकल पकडण्यास धावत असताना दुसºया रुळावरुन हॉर्न वाजवत फास्ट लोकल आली अन् काही मिनिटांसाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ही लोकल गेल्यानंतर दोन्ही तरुण सुखरूप असल्याचे दिसून आले.दोन जण केईएम रुग्णालयातदाखल, चार जणांना डिस्चार्जआगमन सोहळ््यात सहभागी झालेल्या सहा जणांवर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान चक्कर आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने सहा जणांना केईएम रुग्णालयात उपचारांसाठी आणले होते. त्यातील तीन तरुणी व एक तरुण याला उपचार करुन सोडण्यात आले. तर सायली लोहार (१८) व श्वेता घाडीगावकर (२२) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना श्वसनास त्रास, छातीला मुकामार लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.सोशल मीडियावरील अपडेट्सची घाईफेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, टिष्ट्वटर अशा वेगवेगळ््या सोशल मीडीयावर आगमन सोहळ््याचे अपडेट्स टाकण्यासाठी तरुणाई प्रचंड घाई करताना दिसून आली.सर्वात आधी या आगमन सोहळ््याचे अपडेट्स कोण शेअर करत, फोटो कोण शेअर करत याविषयी काहीशी स्पर्धा तरुणाईत दिसून आली. त्यामुळे सोशल मीडीयावर अपडेट्सची घाई न करता जीव सांभाळून मोबाईलचा वापर करणे गरजेचे आहे.दुभाजकांवरील रोपांचे नुकसानलालबागपूलाखाली सौंदर्यीकरणांतर्गत रोपे लावण्यात आली होती़ आगमन सोहळ््यादरम्यान उपस्थित तरुणाईने या दुभाजकांवरुनही उड्या मारल्याने सर्व रोपांचे नुकसान झालेले दिसून आले.ऐन पावसाळ््यात हिरवीगार वाढ झालेल्या या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेपुलावरून गाड्या थांबवून दर्शनलालबाग पूलावर कुणीही बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ नये, असे बजाविण्यात आले होते. तरीही काही जण पूलावर जाऊन वाकून फोटो आणि व्हीडीओ शूटसाठी धडपड करत असलेले दिसून आले. पूलावरुन जाणा-या काही वाहनांनी गाड्या थांबवून दर्शन घेताना आढळून आले.चप्पल, प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खचआगमन सोहळ््यानंतर लालबाग, परळ आणि चिंचपोकळी परिसरात चप्पल आणि बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच दिसून आला. मंडळाच्या वतीने प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच उचायला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. तर कचरा जमा करणारे कर्मचारी या प्लास्टीकच्या बाटल्या उचलताना दिसून आल्या.फोटोसाठी कायपण..!आगमन सोहळ््यात बाप्पाचे फोटो आणि व्हीडीओ काढणाºया फोटोग्राफर्सचा सुळसुळाट दिसून आला. फोटो आणि व्हीडीओ काढण्यासाठी गाड्यांवर चढणे, खांब- बांबूवर चढणे, पदपथावरील बॅरिकेड्सवर चढणे, एकमेकांच्या खांद्यावर चढून फोटो काढणे अशा कसरती करताना अनेक फोटोग्राफर्स दिसून आले.

 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई