Join us

चिंतन उपाध्यायसह चार जणांवर आरोपपत्र दाखल

By admin | Published: March 12, 2016 3:53 AM

कलाकार हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरीश भांबानी यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी चार जणांविरुद्ध शुक्रवारी १६५८ पानांचे आरोपपत्र महानगर दंडाधिकारी कुलकर्णी यांच्या न्यायालयात दाखल केले.

डिप्पी वांकाणी , मुंबईकलाकार हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरीश भांबानी यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी चार जणांविरुद्ध शुक्रवारी १६५८ पानांचे आरोपपत्र महानगर दंडाधिकारी डी. डी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात दाखल केले. त्यात ६० पुराव्यांचा उल्लेख असून आरोपींमध्ये हेमा उपाध्यायचा तिच्यापासून वेगळा राहात असलेल्या पती चिंतन याचाही समावेश आहे.हेमा उपाध्यायच्या हत्येमागे त्यांच्या घटस्फोटाची कडवट बनलेली प्रक्रिया, मालमत्ता आणि घटस्फोटानंतरची पोटगी अशा प्रश्नांमुळे चिंतनच्या मनात हेमाबद्दल निर्माण झालेला द्वेष असल्याचे पोलिसांनी म्हटले. चिंतन, प्रदीप राजभर, विजय राजभर आणि साधू राजभर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महानगर दंडाधिकारी हा खटला बहुधा सुनावणीसाठी सत्र न्यायालयात पाठवतील. या खटल्यात एक आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावरील आरोपपत्र बाल न्याय मंडळासमोर दाखल करण्यात आले.आरोपपत्रात पोलिसांनी ६० साक्षीदारांचे म्हणणे जोडले आहे. त्यात फरार असलेल्या विद्याधर राजभर या आरोपीच्या आईचे म्हणणे आहे. तिने सांगितले की विद्याधरने हेमाला बोलावले होते आणि चिंतनकडून चांगल्या मोबदल्यात आणि त्याच्याच सांगण्यावरून त्या दोघांची हत्या केली हे त्याने कबूल केले होते. हेमाची हत्या झाली त्याच्या आदल्या सायंकाळी चिंतनने काढलेली आक्षेपार्ह चित्रे आणि गाणे सोशल नेटवर्किंग फेसबुक साईटवर पोस्ट केले होते. ‘अलविदा’ (निरोप) असे त्याचे स्वरूप होते. महत्वाच्या पुराव्यांमध्ये या पोस्टचा पोलिसांनी समावेश केला आहे. चिंतन आणि इतर आरोपी (प्रामुख्याने विद्याधर) याच्यातील कॉल डाटा रेकॉर्ड पोलिसांनी जोडले आहे. अंधेरी येथील स्टुडिओत ११ डिसेंबर २०१५ रोजी शेवटचे एकत्र दिसलेले हेमा आणि हरीश भांबानी यांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी दाखल केले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार या दोघांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर काही जखमाही दिसल्या. याशिवाय न्यायवैद्यक प्रयोगशाळेनेच्या (फॉरेन्सिक लॅबरोटरी) अहवालाचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.