मुंबई : कांजूरमार्ग येथे रिक्षात सापडलेल्या एक महिन्याच्या चिमुरडीवर सायन रुणालयात लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. त्या चिमुरडीला जन्मत: मेंदूचा विकार आहे. लवकरच तिच्या सिटीस्कैन, एमआरआय यासारख्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया कधी करायची याविषयी निर्णय घेण्यात येईल अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ जयश्री मोंडकर यांनी दिली.एका रिक्षामध्ये चिमुरडीला कोणीतरी सोडून निघून गेले होते. ही बाब कांजुरमार्ग पोलिसांना समजताच त्यांनी चिमुरडीला ताब्यात घेत सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ’त्या’ चिमुरडीला हायड्रोसिफलस हा मेंदूविकार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या आजारात मेंदूत पाणी साचते. शिवाय, मेंदूच्या काही भागाला सूज देखील येते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते असे डॉ.मोंडकर यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ चिमुरडीवर होणार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:37 AM