चित्रा वाघ राजकीय 'रोजगार हमी योजनेच्या मजूर', सुषमा अंधारेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:30 PM2022-11-22T15:30:40+5:302022-11-22T15:31:44+5:30

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता.

Chitra Vagh Political 'Employment Guarantee Yojana Labour', Sushma Andhare's Bochy Criticism | चित्रा वाघ राजकीय 'रोजगार हमी योजनेच्या मजूर', सुषमा अंधारेंची बोचरी टीका

चित्रा वाघ राजकीय 'रोजगार हमी योजनेच्या मजूर', सुषमा अंधारेंची बोचरी टीका

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना न्यूज स्टुडिओतील महिला अँकरच्या पोशाषाबद्दल टिपण्णी केली. त्यावेळी, महिला अँकर ह्या पाश्चिमात्य ड्रेस परिधान करतात, साडी नाही. केवळ दिवाळीलाच साडी दिसून येते, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते. त्यावरुन, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधत, टिकलीचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाष्य केलं. यावेळी, चित्रा वाघ ह्या चित्र-वचित्र बोलत असतात, त्या सध्या फ्रस्टेशनमध्ये आहेत, असे अंधारे यांनी म्हटले.  

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच, खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं, त्यानंतर, चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ ट्विटरला शेअर करत अनेक प्रश्न उपस्थित केले. या वादात आता शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांनी रोजगार हमी योजनेतील मजूर म्हणत बोचरी टीका केली. 

चित्रा वाघ यांना काहीही मिळालं नाही, भाजप सत्तेत येऊनही त्यांना कुठलंच पद नाही.  आमदारकीही नाही, त्यामुळे त्या काहीही बोलत असतात. चित्राताई या भाजपशी बांधिलकी जपून बोलतात. या त्याच ताई आहेत, ज्या संजय राठोड प्रकरणावर आता गप्प असतात. त्या, गरीब मुलीची अब्रू यांनी चव्हाट्यावर आणली त्यासाठी यांना कोण जाब विचारणार? या नेहमीच चित्र विचित्र बोलत असतात, त्या फर्स्ट्रेशनमध्ये आहेत, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. 

तसेच, हाथरस प्रकरण, सोलापूरमधील भाजप नेत्यासोबतच्या पीडित महिलेचं प्रकरण, राहुल शेवाळेविरुद्ध महिलेने व्हिडीओ ट्विट केलं, त्यावर या काहीही बोलल्या नाहीत, राजकीय रोजगार हमी योजनेवर मजूर बनून काम करत असल्यासारखं हे बोलत असतात, अशी बोचरी टिकाही अंधारे यांनी केली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ 

चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानावर टीका केली असून, व्हिडीओ ट्वीट करत ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? अशी विचारणा केली आहे. चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या असंही त्या उपहासात्मकपणे म्हणाल्या आहेत.

Web Title: Chitra Vagh Political 'Employment Guarantee Yojana Labour', Sushma Andhare's Bochy Criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.