राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:08 PM2019-07-26T23:08:20+5:302019-07-26T23:10:11+5:30
चित्रा वाघ यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला मागील काही दिवसांपासून अनेक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीचे मोठे नेते पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
चित्रा वाघ यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला काम करण्याची संधी दिल्याबद्दल शरद पवारांचे आभार मानले आहे. चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.
My Resignation 🙏 @NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@ANIpic.twitter.com/IohS5J5iz6
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) July 26, 2019
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीने चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चित्रा वाघ या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यादेखील आहेत.