Join us

सणांचा गोडवा वाढविणा-या चॉकलेट्सची आवक वाढली, हँडमेड चॉकलेट्सना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 3:19 AM

नवरात्रौत्सव धूमधडाक्यात सुरू असून, आता दसरा, दिवाळीचे वेध सर्वांना लागले आहेत. विविध वस्तूंसह सणासुदीचा गोडवा वाढविणा-या आणि अबालवृद्ध सर्वांनाच खाण्याचा मोह होणा-या वैविध्यपूर्ण चॉकलेट्सची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे.

- सागर नेवरेकर ।मुंबई : नवरात्रौत्सव धूमधडाक्यात सुरू असून, आता दसरा, दिवाळीचे वेध सर्वांना लागले आहेत. विविध वस्तूंसह सणासुदीचा गोडवा वाढविणा-या आणि अबालवृद्ध सर्वांनाच खाण्याचा मोह होणा-या वैविध्यपूर्ण चॉकलेट्सची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे.सणांच्या दिवसांतील गोड भेटवस्तू म्हणजे ‘चॉकलेट’. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला, चेंबूर या मोठ्या मार्केटमध्ये चॉकलेटने दुकाने सजली आहेत. दिवाळीत खासकरून भाऊबीजेच्या दिवशी चॉकलेटला मोठी मागणी असते. कॅडबरी, नेस्ले, फेरेरो इंडिया, अमूल, मार्कस्, कॅम्पको, चॉकोन इंडिया, पारले, लोट्स, कँडीमॅन हे देशी चॉकलेट्सचे ब्रँड सध्या बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट्सचे आंतरराष्ट्रीय ब्रँडही बाजारात सहज मिळत आहेत. गणेशोत्सवात मावा मोदक आणि उकडीच्या मोदकांपेक्षा चॉकलेट्सच्या मोदकांना यंदा जास्त मागणी होती. हाच ट्रेंड आता यापुढील सणांमध्येही सुरू राहील, असे काही विक्रेते आणि व्यापाºयांनी सांगितले.चिली चॉकलेट, पान चॉकलेट, मसाला चॉकलेट या फ्लेव्हरमधील हँडमेड चॉकलेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. डार्क (कडवट) चॉकलेट लोकांना जास्त आवडतात, असे एका विक्रेत्याने सांगितले. स्वित्झर्लंड, बेल्जियम, जर्मनी, दुबई, पॅरिस, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, डेन्मार्क इत्यादी देशांतून चॉकलेट्सची मोठी आवक देशात होते. चांगल्या दर्जाचे चॉकलेट्स बाजारात ३ हजार रुपये किलो दरानेही उपलब्ध आहेत, तसेच देशात बनलेले चॉकलेट्स दीड हजार रुपये किलो दराने मिळत आहेत. विदेशातील चॉकलेट्सचीही ग्राहकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. यापुढे चॉकलेट्सची मागणी मिठाईपेक्षाही वाढेल, असे मत एका विक्रेत्याने व्यक्त केले.दिवाळीच्या तयारीची लगबगमोर्डे, बॅलिकॅलेबर, लिबोन ब्रँडचे चॉकलेट खरेदी करून,त्यावर प्रक्रिया करून, काही जण स्वत:चे ब्रँड तयार करतात. शहरातील वेगवेगळ््या बाजारात या चॉकलेट्सना मागणीअसते. दिवाळीमध्ये चॉकलेट्सची मागणी अधिक वाढते. त्यामुळे कामगारांची संख्यादेखील वाढवावी लागते.- नीलम बोरा, चॉकलेट विक्रेताहँडमेड चॉकलेट्सना पसंतीमॉर्डे चॉकलेट अन्य हँडमेड वस्तूदेखील बनविते. आंतराष्ट्रीय बाजारात बेल्जिअमच्या चॉकलेट कंपन्या प्रसिद्ध आहेत. त्यादेखील हँडमेड चॉकलेट बनवितात. सध्या बाजारात हँडमेड चॉकलेट्सना मोठी मागणी आहे. हँडमेड चॉकलेट फे्रश असल्याने, ते ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. - गगनदीप सिंग, चॉकलेट विक्रेताचॉकलेट उद्योगाला सुवर्णसंधीमहिलांसाठी चॉकलेट मेकिंगचे क्लासेस घेतले जातात. व्यवसाय म्हणूनदेखील बहुसंख्य लोक या क्षेत्रात येत आहेत. चॉकलेट गुढी आम्ही बनविली होती, त्यालाही चांगली दाद मिळाली. पूर्वी डार्क चॉकलेट आणि व्हाइट चॉकलेटला मिक्स करून एक चॉकलेट बनविले जायचे, परंतु आता अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. चॉकलेट हा खूप मोठा उद्योग असून, तरुणांना चॉकलेट उद्योगात सुवर्णसंधी आहे.- जान्हवी राऊळ, ब्रँड गुरू

टॅग्स :नवरात्रौत्सव २०१७