प्लास्टिकला कापडी पिशव्यांचा पर्याय - रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:24 AM2018-03-20T00:24:23+5:302018-03-20T00:24:23+5:30
प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत कदम यांनी मंत्रालयात चर्चा केली.
मुंबई : प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत कदम यांनी मंत्रालयात चर्चा केली.
प्लास्टिक उद्योजकांना त्यांचाकडील शिल्लक असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग, पिशव्या नष्ट करण्यासाठी निश्चितच काही कालावधी दिला जाईल. त्याचबरोबर कुठलेही प्लास्टिकचे उत्पादन, कॅरीबॅग निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिक उद्योजकांनी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक महिला बचतगटांनी कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या बनविणे सुरू केले आहे. जे उद्योजक कॅरीबॅग तयार करायचे त्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याकडे वळले पाहिजे. त्यासाठी शासन नक्कीच मदत करेल. राज्यातील प्लास्टिक कारखान्यात काम करणारे जे कामगार असतील व प्लास्टिक बंदीमुळे बेरोजगार होणार असतील तर त्यांच्या बाबतीतही योग्य निर्णय घेऊ. अशा कामगारांची यादी प्लास्टिक उद्योजकांनी द्यावी, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
एस.एम.एस. कंपनीने मुंबई सोडावी
मानखुर्द येथील एस.एम.एस. कंपनीतून प्रदूषण होत असल्याबाबत या कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार अबू आझमी यांच्या शिष्टमंडळाने रामदास कदम यांची भेट घेतली. या वेळी कदम म्हणाले, जैविक कचºयाची विल्हेवाट लावणाºया या प्रकल्पाने मुंबईबाहेर प्रकल्प नेण्याचे निर्देश दिले. या प्रकपाच्या धुरामुळे मानखुर्द भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावेळी कंपनीचे अधिकारी आणि मानखुर्द परिसरातील नागरिक उपस्थित होते.