नागरी सुविधांसाठी ‘आॅनलाइन’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:33 AM2018-03-17T02:33:38+5:302018-03-17T02:33:38+5:30
नागरी सेवा व सुविधांसाठी हायटेक मार्ग अवलंबण्याच्या महापालिकेच्या प्रयोगाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. म्हणूनच विविध नागरी सेवा-सुविधाशी संबंधित अर्ज, नोंदणी, नूतनीकरण आदींसाठी आॅनलाइन वापरकर्त्यांच्या संख्येत १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तब्बल ४५१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : नागरी सेवा व सुविधांसाठी हायटेक मार्ग अवलंबण्याच्या महापालिकेच्या प्रयोगाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. म्हणूनच विविध नागरी सेवा-सुविधाशी संबंधित अर्ज, नोंदणी, नूतनीकरण आदींसाठी आॅनलाइन वापरकर्त्यांच्या संख्येत १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तब्बल ४५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ७४ हजार ५११ अर्जदारांनी आॅनलाइन सेवेचा लाभ घेतला होता. ही संख्या आता ४ लाख १० हजार ५२५वर पोहोचली आहे, तर कार्यालयात जाऊन अर्ज करणाऱ्यांची संख्या यंदा केवळ २५ हजार ८६ आहे.
विविध नागरी सेवा-सुविधांसाठी नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात खेपा घालाव्या लागू नयेत, यासाठी आॅनलाइन सेवा सुरू करण्यात आली होती. या वर्षी २८ सेवा-सुविधांशी संबंधित प्रक्रिया आतापर्यंत आॅनलाइन करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुकानांचा परवाना, विवाह नोंदणी, चर खोदणे, आरोग्य परवाने, व्यवसाय परवाने, जाहिरात अनुज्ञाप्ती, नवीन कारखाना परवाना, जल जोडणी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, शिक्षण खात्याशी संबंधित अर्ज, पाण्याचा टँकर, मृत्यू प्रमाणपत्र, नवरात्री व गणेशोत्सवसंबंधी परवानग्या, चित्रीकरण परवानग्या आदी बाबींचा समावेश आहे.
>अर्जांची संख्या
१ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक २ लाख १२ हजार ३२३ आॅनलाइन अर्ज दुकान परवान्याच्या नूतनीकरणासाठी असणाºया शॉप फॉर्म बी अंतर्गत प्राप्त झाले आहेत. तर याच कारणासाठी आॅफलाइन अर्ज करणाºयांची संख्या ३९ एवढी आहे.
यापाठोपाठ नवीन दुकानाच्या नोंदणीसाठी असणाºया शॉप फॉर्म ए करिता १ लाख १२ हजार ४८९ आॅनलाइन अर्ज; तर याच कारणासाठी केवळ एक आॅफलाइन अर्ज प्राप्त झाला आहे.
विवाह नोंदणीसाठी ४९ हजार ६४९ आॅनलाइन अर्ज; विशेष म्हणजे यासाठी एकही आॅफलाइन अर्ज प्राप्त झाला नाही.
दुकानाच्या किंवा दुकान मालकाच्या नावात बदल करण्यासाठी असलेल्या फॉर्मकरिता २९ हजार १७७ आॅनलाइन अर्ज; तर याच कारणासाठी ७८ अर्ज जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहेत.
चर खोदण्यासाठीचे सर्वच अर्ज आॅनलाइनच स्वीकारले जातात; यानुसार तीन हजार ८३१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
आरोग्य परवाने, व्यापार परवाने, कारखाना परवाना, वॉटर टँकर, होर्डिंग्ज लायसन्स, जाहिरात परवाना, श्वान परवाना इत्यादी बाबींसाठीदेखील मोठ्या प्रमाणात आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे सेवा-सुविधांपोटी महापालिकेला प्राप्त होणाºया एकूण शुल्कापैकी तब्बल ९७ टक्के शुल्क हे आॅनलाइन
पद्धतीने, तर केवळ तीन टक्के शुल्क हे जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहे.