असे निवडावे करिअर...
By admin | Published: May 25, 2015 02:34 AM2015-05-25T02:34:34+5:302015-05-25T02:34:34+5:30
दहावीनंतरच्या विविध पयार्यांचा विचार करण्यापूर्वी तुम्ही तुमचे करिअर कसे निवडावे याचे काही ठोकताळे आहेत, ते आपण पाहू. तुमच्या निर्णयाचा
दहावीनंतरच्या विविध पयार्यांचा विचार करण्यापूर्वी तुम्ही तुमचे करिअर कसे निवडावे याचे काही ठोकताळे आहेत, ते आपण पाहू.
तुमच्या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमची आवड. तुम्हाला काय आवडते किंवा काय व्हावेसे वाटते? काहींना लहानपणापासून काही विशिष्ट करिअरने झपाटलेले असते. मला लहानपणासून क्रिकेटर व्हावेसे वाटे. अर्थात त्याचे कारण सचिन तेंडुलकर. मी त्यासाठी क्रिकेट कोचिंगला प्रवेशसुद्धा घेतला होता. पुढे मला असे वाटले, की वाचन आणि अभ्यास हा माझा आवडीचा भाग आहे आणि क्रिकेट मागे पडले. तसे काही तुमच्याबाबतीत आहे का? अनेकदा तुमचा छंद हेच तुमचे करिअर होते आणि तेच अधिक योग्य आहे. असे म्हणतात की करिअर असे असावे, जे तुम्हाला आवडते. बऱ्याच माणसांच्या बाबतीत हे घडते, की चाकोरीबद्ध जगताना ते पैसे तर कमावतात, पण त्यांच्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही. फक्त जगरहाटी आहे म्हणून नोकरी व्यवसाय करतात. त्यामुळे हे लोक खूश नसतात, सुखी नसतात!
तुमच्या आवडीच्या गोष्टी काय आहेत हे पाहा. म्हणजे खेळ - त्यात अनेक प्रकार, नाटक कला, चित्र किंवा दुसरे छंद, अभ्यास - त्यातही इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान - अगदी विज्ञानातही धूमकेतू, अंतराळ, ग्रह किंवा माणसाच्या शरीराची रचना या सगळ्या गोष्टी तुमचे करिअर काय असावे याचे द्योतक आहेत. कारण तुमची आवड हेच तुमचे करिअर झाले तर तुम्ही सुखी होणार आहात.