आयुष्याचा जोडीदार निर्व्यसनीच निवडा
By admin | Published: February 10, 2016 03:57 AM2016-02-10T03:57:14+5:302016-02-10T03:57:14+5:30
व्यसनाधीनतेकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी राज्याच्या नशाबंदी मंडळाने नवी शक्कल लढवली आहे. शुक्रवारी, १२ फेब्रुवारीला सीएसटी येथील
मुंबई : व्यसनाधीनतेकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी राज्याच्या नशाबंदी मंडळाने नवी शक्कल लढवली आहे. शुक्रवारी, १२ फेब्रुवारीला सीएसटी येथील १३८ क्रमांकाच्या बस स्टॉपसमोर १०० तरुणी रस्त्यावर उतरून निर्व्यसनी जोडीदार निवडण्याची शपथ घेणार आहेत.
सीएसटी परिसरात चेहऱ्यावर ‘निर्व्यसनी जोडीदार मज हवा’ अशा संदेशाचे मास्क लावून तरुणी जनजागृती करतील, असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘जनजागृतीदरम्यान प्रेरित तरुणांना ग्राफिटीवर स्वाक्षऱ्या करण्यास सांगून संकल्प केला जाईल. शिवाय तरुणी ‘प्रेम करा, मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ असे आवाहन करणारी पत्रकेही वाटतील.
व्यसनमुक्तीच्या लढ्यात तरुणाईने पुढाकार घ्यावा, म्हणून हा हटके प्रयोग करणार आहोत,’ असेही वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शुक्रवारी, १२ फेब्रुवारीला सीएसटी येथील १३८ क्रमांकाच्या बस स्टॉपसमोर
१00 तरुणी रस्त्यावर उतरून निर्व्यसनी जोडीदार निवडण्याची शपथ घेणार आहेत.