Join us

रेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरी आत्महत्या; बहिण लिजेल म्हणाली, “तुला कधीच माफ करणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:29 PM

जेसन वाटकिंसच्या मृत्यूनं लिजेलवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा(Remo D’Souza) चा मेव्हणा जैसन वाटकिंसनं राहत्या घरी आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे. रेमो डिसूझाची पत्नी लिजेल डिसूझानं भावाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत का? तु माझ्यासोबत असं कसं करु शकतो? मी तुला कधीही माफ करणार नाही असं म्हटलं आहे.

लिजेल डिसूझानं दोन फोटो शेअर केले आहेत. लिजेल भाऊ जेसन वाटकिंससोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत त्यावर का? असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या फोटोत जेसन आईसोबत रिक्षात बसल्याचं दिसून येते. लिजेलनं त्या फोटोवर सॉरी आई, मी तुला फेल केले असं म्हटलं आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, डिसूझा यांच्या जवळच्या निकटवर्तीयांनी या बातमीची पुष्टी केली आहे.

जेसन वाटकिंसचा मृतदेह कूपर हॉस्पिटलला पोस्टमोर्टम करण्यासाठी आणला होता. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली. जेसन वाटकिंसचं अद्याप लग्नही झालं नव्हतं. जेसनच्या या टोकाच्या निर्णयानं रेमो डिसूझा आणि पत्नी लिजेल डिसूझावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ४ वर्षापूर्वी लिजेलच्या आईचं निधन झालं होतं त्यानंतर आता भावाचाही मृत्यू झाला आहे.

 

लिजेल डिसूझानं सांगितले की, जेव्हा वडिलांनी दरवाजा उघडला तेव्हा भावाचा मृतदेह त्यांना दिसला. वडील डायलिसिसचे रुग्ण आहेत. भावाने हे का केले? याची कल्पना नाही. भाऊ आणि वडील एकत्र राहत होते. आईच्या निधनानंतर तो खूप दुखी असायचा. २०१८ मध्ये आईचं निधन झालं. भाऊ आईच्या खूप जवळ होता. मी गोव्याला लग्नासाठी गेले होते. त्याठिकाणी मला कॉल आला. आम्हाला या बातमीनं खूप मोठा धक्का बसल्याचं लिजेल डिसूझा म्हणाली. रेमो डिसूझा आणि लिजेल डिसूझा सध्या गोव्यात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी गेले होते. रेमो डिसूझाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संवाद झाला नाही. विशेष म्हणजे जेसन वाटकिंस फिल्म इंडस्ट्री अनेक वर्षापासून काम करत होता. रेमो डिसूझा यांच्या सर्व प्रोजेक्टमध्ये तो असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहायचा. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.

 

टॅग्स :रेमो डिसुझामुंबई पोलीस