Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 08:05 PM2021-12-23T20:05:40+5:302021-12-23T20:13:25+5:30

कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत.

Christmas 2021: State Government Rules Announced for Christmas; An appeal to celebrate the festival with simplicity | Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

Next

मुंबई: देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. १४ राज्यांत एकूण २२०हून अधिक जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढू लागले आहे, असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत येणार नाताळ सण देखील साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. (Christmas 2021) 

कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. याचपार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच नाताळसाठी नियमाली देखील शासनाने जाहीर केली आहे. 

काय आहे नेमकं नियमावलीमध्ये जाणून घ्या...

  1. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा.
  2. चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.
  3. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये.
  4. चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये.
  5. कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये.
  6. कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
  7. स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ५०% लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी  जास्त जणांचा समावेश नसावा.
  8. सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य

दरम्यान, महापालिकेमार्फत २४ विभागस्तरांवर प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन पथके वाढविण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. ही पथके त्या त्या विभागांतील हॉटेल, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील कार्यक्रम यावर लक्ष ठेवून असणार आहे. या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या क्षमतेएवढे अथवा त्यापेक्षा कमी लोकांची हजेरी असणे अपेक्षित आहे. तसेच मालक, कर्मचारी, ग्राहक यांच्या तोंडाला मास्क आणि सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सुधारित नियमावली येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Christmas 2021: State Government Rules Announced for Christmas; An appeal to celebrate the festival with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.