मुंबई : नाताळ म्हटला की, गोडधोड पदार्थ आलेच. सध्या नाताळसाठी अनेक बेकरींमध्ये केक, पुडिंग, चॉकलेट्स अशा पदार्थांची रेलचेल आहे. यंदा या गोडधोड पदार्थांत अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. नव्या फ्लेवर्सची भर पडली आहे. हे फ्लेवर्स चाखण्यासाठी अनेक खवय्यांची मुंबई आणि उपनगरांतल्या बेकरींमध्ये गर्दी दिसत आहे. मुख्यत्वे वांद्रे, चर्चगेट, सांताक्रूझ, लोअर परेल या भागांतील बेकरींमध्ये नाताळचे खास पदार्थ उपलब्ध आहेत. वाइन फ्लेवरच्या केकची या दिवसात फार चलती असते. या केकसाठी रेड आणि व्हाइट वाइन वापरली जाते. हा केक लोफ आकारात असून त्यात वैविध्य आणण्यासाठी टुटी-फ्रुटी, चॉकलेट चिप्स, कॅरेमल, मिक्स-ड्रायफ्रुट, फ्रेश फ्रुट, फ्रेश क्रीम असे प्रकार वापरले जातात. लहान लहान कप केक्स व्हॅनिला, चॉकलेट बेसमध्ये मिळतात. यंदा खास नाताळनिमित्त कपकेकवर फ्रॉस्टिंग करण्यात आली आहे. ख्रिसमस ट्री, सांताचा चेहरा, पायमोजे यांसारखी सजावट यावर पाहायला मिळत आहे. यासोबत मुलांना आवडणाऱ्या कार्टुनचासुद्धा या सजावटीत समावेश आहे. या सजावटीत भर म्हणून त्यावर रंगीबेरंगी शुगर बॉल्स आणि वर्मिसेलीने सजावट करण्यात आली आहे. याशिवाय डोनट्स, स्विस रोल हे प्रकारही ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये मिळणारे स्विस रोल आणि कपकेक्सप्रमाणे सजवलेले डोनट्स अनेक जण भेट देण्यासाठी विकत घेतात, असे एका विक्रेत्याने सांगितले. तसेच लॉलीपॉप, चॉकलेट, कँडी, कुकीज, ब्राऊनी, पुडिंग या गोडधोड पदार्थांमध्येही फ्लेवर्सची विविधता आहे. पूर्वापार चालत आलेले पारंपरिक गोडाचे पदार्थ उदा. कुलकुल, रोझ कुकीज, गुजिया, मार्बल केकसुद्धा आहेत. (प्रतिनिधी)नावीन्यपूर्ण चॉकलेट फ्लेवरचॉकलेटमध्येही यंदा फ्युजन फ्लेवर्स उपलब्ध आहेत. एका चॉकलेटमध्ये दोन वेगवेगळे फ्लेवर्स एकत्र करण्याचा प्रयत्न अनेक चॉकलेट मेकर्सनी केलेला आहे. यात रम, वाइन आॅरेंज झेस्ट, ड्रायफ्रुट, मिक्स फ्रुट जॅम, सेंटर जेली चॉकलेट्सचा समावेश आहे. केक, कुकीजचे दरलोफ केक - ५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंतकपकेप - २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत (फ्रॉस्टिंग केलेले कपकेक्स या किमतीहून अधिक असण्याची शक्यता)डोनट्स - ३० ते ६० रुपये नग ब्राऊनी - १०० ते १५० रुपये (पुडा)कुकीज - ७० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत (१० ते १२ नग, आकारात विविधता)मुख्यत्वे वांद्रे, चर्चगेट, सांताक्रूझ, लोअर परेल या भागांतील बेकरींमध्ये नाताळचे खास पदार्थ उपलब्ध आहेत. वाइन फ्लेवरच्या केकची या दिवसात फार चलती असते. या केकसाठी रेड आणि व्हाइट वाइन वापरली जाते. हा केक लोफ आकारात असून त्यात वैविध्य आणण्यासाठी टुटी-फ्रुटी, चॉकलेट चिप्स, कॅरेमल, मिक्स-ड्रायफ्रुट, फ्रेश फ्रुट, फ्रेश क्रीम असे प्रकार वापरले जातात.
बाजारात नाताळचा गोडवा
By admin | Published: December 23, 2015 12:57 AM