मुंबई : मुंबईतील सर्व बाजारपेठांवर सध्या नाताळची जादू दिसत आहे. मध्य मुंबईसह उपनगरांत रविवारी खरेदीसाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम दिसली. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच मॉल आणि शोरूम चालकांनी या आनंदाचा फायदा घेण्यासाठी थर्टी फर्स्टपर्यंत विविध आॅफर्सचा वर्षाव केला आहे.मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटपासून मंगलदास मार्केटपर्यंत बहुतांश दुकाने, शोरूम आणि मॉलमध्ये वस्तू, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आॅफर्स दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या आॅफर्सचा फटका आपल्याला बसू नये, म्हणून नामांकित कंपन्यांच्या शोरूमनेही ५० ते ७० टक्क्यांपर्यंत सूट दिलेली आहे. मॉलमध्येही विविध वस्तू व पदार्थांवर सूट दिली जात असून अधिक खरेदी केल्यावर डिस्काउंट कूपन वाटण्यात येत आहेत. तर बहुतेक दुकानदारांनी नवा माल भरण्यासाठी जुना माल विक्रीस काढताना ख्रिसमस आॅफर्सची मदत घेतली आहे.बाजारपेठांमध्ये नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसले. यामध्ये सँटाची टोपी, ख्रिसमस बेल, आॅर्किड फुलांनी केलेली सजावट, विविध प्रकारचे केक, चॉकलेट यांचा समावेश आहे. नाताळच्या सेलिब्रेशनसाठी कुलाब्यातील होली नेम कॅथड्रेल, सेंट जॉन चर्च, फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथड्रेल, भायखळ्यातील ग्लोरिया चर्च, माहिममधील सेंट मिशेल चर्च, वांद्रे येथील माऊंट मेरी बॅसिलिका व सेंट एण्ड्र्यू चर्च आणि बोरीवलीतील लेडी आॅफ इमैक्युलेट कन्सेप्शन या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.थर्टी फर्स्ट पार्टीसाठी मुंबई सज्जख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बहुतांश हॉटेलचे पार्टी हॉल आठवडाभरासाठी बुक झाले आहेत. मुंबईनजीकच्या फार्म हाउस आणि रिसॉर्टमध्ये आधीच बुकिंग झाल्याची माहिती आहे.सँटाची अशीही धमालनाताळनिमित्त घरांत, कार्यालयांत आणि विविध ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. ख्रिसमस ट्रीसह रंगीबेरंगी गिफ्टने मुंबईला भुरळ घातली आहे. त्यात मुलींच्या डोक्यावर लावण्यात येणाºया चापपासून डोळ्यांवर लावणाºया गॉगलवरही सँटाची नक्षी आणि मेरी ख्रिसमसचे संदेश कोरण्यात आले आहेत.
नाताळच्या खरेदीची धूम..! थर्टी फर्स्टपर्यंत ग्राहकांवर आॅफर्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:46 AM