‘चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल दुचाकी, तीन चाकी वाहनांसाठी खुला करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:33 AM2019-11-14T01:33:46+5:302019-11-14T01:33:58+5:30
चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलाचा फायदा सामान्य नागरिकांनाही झाला पाहिजे.
मुंबई : चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलाचा फायदा सामान्य नागरिकांनाही झाला पाहिजे. तीन चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी हा उड्डाणपूल खुला करावा, अशी मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले आहे. त्यात कुडाळकर यांनी म्हटले आहे, चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल रविवारी खुला करण्यात आला. या उड्डाणपुलामुळे ३० मिनिटांचा प्रवास कमी झाला आहे. हा उड्डाणपूल हलक्या चार चाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला तर तीन चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी बंदी आहे. तीन चाकी आणि दुचाकी वाहनांसाठीही तो खुला करण्यात यावा़ काही दुचाकीस्वार वेगात वाहने चालवितात तसेच इतर वाहतूक नियमांचेही उल्लंघन करतात़ त्यामुळे दुचाकींना बंदी घातल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.