१० नाटकांमध्ये रंगणार चुरस

By admin | Published: April 16, 2016 01:20 AM2016-04-16T01:20:35+5:302016-04-16T01:20:35+5:30

यंदा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. त्यात अंतिम फेरी

Churas in 10 plays | १० नाटकांमध्ये रंगणार चुरस

१० नाटकांमध्ये रंगणार चुरस

Next

मुंबई : यंदा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. त्यात अंतिम फेरीसाठी १० नाटकांची निवड करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेत एकूण ३७ नाट्य संस्थांनी प्रयोग सादर केले. त्यात ‘सेल्फी’ (असीम एंटरटेन्मेंट), ‘वाडा चिरेबंदी’ (जिगीषा आणि अष्टविनायक), ‘दोन स्पेशल’ (अथर्व थिएटर), ‘अ फेअर डील’ (श्री सिद्धिविनायक), ‘हा शेखर खोसला कोण आहे’ (भद्रकाली प्रॉडक्शन), ‘शेवग्याच्या शेंगा’ (श्री चिंतामणी), ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ (सोनल प्रॉडक्शन), ‘परफेक्ट मिसमॅच’ (सोनल प्रॉडक्शन), ‘श्री बाई समर्थ’ (अष्टविनायक), ‘सर्किट हाऊस’ (प्रवेश व भूमिका थिएटर्स) या नाटकांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रवींद्र बेर्डे, विजय तापस आणि प्रमोद पवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेची
अंतिम फेरी प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली येथे २ ते १२ मे २०१६ या कालावधीत होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Churas in 10 plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.