चर्चगेट-मुंबई सेेंट्रल रेल्वे बंद; शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 03:36 AM2020-02-08T03:36:18+5:302020-02-08T03:36:56+5:30
चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रोड ओव्हर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवारी मध्यरात्री ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रोड ओव्हर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवारी मध्यरात्री ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल लोकल सेवा उपलब्ध नसेल. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१५ वाजता ब्लॉक सुरू होईल, तो ९ फेब्रुवारी सकाळी ६.१५पर्यंत असेल.
ब्लॉकच्या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल लोकल बंद असतील. चर्चगेटहून बोरीवली दिशेकडे जाणारी शेवटची धिमी लोकल रात्री ९.५१ वाजता, तर चर्चगेटहून विरार दिशेकडे जाणारी शेवटची जलद लोकल रात्री १०.०१ वाजता सुटेल. रात्री ९.०३ वाजता शेवटची बोरीवली-चर्चगेट धिमी लोकल असेल. ती चर्चगेट येथे रात्री १०.१० वाजता पोहोचेल.
रात्री १०.५१ वाजता शेवटची विरार-चर्चगेट जलद लोकल असेल.रात्री ९.३२ची गोरेगाव-चर्चगेट लोकल, रात्री १२.३१ची चर्चगेट ते अंधेरी लोकल, पहाटे ५.५९ची चर्चगेट-अंधेरी लोकल, सकाळी ७.०५ची गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.