मुंबई : प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलमुळे पश्चिम रेल्वे विरुद्ध प्रवाशांमध्ये नाराजी पसरत आहे. एसी लोकल हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र हा उपक्रम सुरू करताना सध्या सुरू असलेल्या फेºया कमी करू नयेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांसह रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता आणि प्रवासी संघटनेच्या वतीनेदेखील या मागणीला पाठिंबा मिळत आहे. परिणामी एसी लोकल मुद्द्यावरून पश्चिम रेल्वे विरुद्ध प्रवासी, रेल्वे कार्यकर्ता आणि प्रवासी संघटना असे चित्र दिसत आहे.बहुप्रतीक्षित एसी लोकलच्या १ जानेवारीपासून चर्चगेट-विरारदरम्यान रोज ८ फेºया होणार आहेत. एसी लोकलमुळे साधारण लोकलच्या फेºया कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल. एसी लोकलचे दर प्रथम दर्जाच्या दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे एसी लोकल प्रवास आवाक्याबाहेर आहे. एसी लोकल हा चांगला उपक्रम आहे. मात्र त्यामुळे आमच्या नेहमीच्या लोकल फेºया कमी करणे अन्यायकारक आहे. १ जानेवारीपासून या ८ फेºया धावल्या नाहीत तर पश्चिम रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती चर्चगेट-विरार प्रवास करणारे प्रदीप माने यांनी दिली.सध्या चर्चगेट-बोरीवली अशी एसी लोकल धावते. बोरीवली फेºया कमी केल्यामुळे सामान्य प्रवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध राग आहे. १ जानेवारीपासून चर्चगेट-विरार मार्गावरील फेºया कमी झाल्यास प्रवाशांमधील असंतोष उफाळून येईल. परिणामी पश्चिम रेल्वेने चर्चगेट-विरार फेºयांसह एकूण कमी केलेल्या १२ सर्वसाधारण लोकल फेºया चालवाव्यात, अशी मागणी रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शकील अहमद यांनी केली आहे. देशातील पहिली वातानुकूलित लोकल मुंबईत सुरू झाली. मात्र ही लोकल सुरू करताना पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. एसी लोकलमुळे साधारण लोकल फेºया बाधित होणार नाहीत, याची दक्षता पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. सध्या काही महिने चर्चगेट-बोरीवली अशीच सेवा सुरू ठेवावी. कमी करण्यात आलेल्या लोकल फेºया तत्काळ सुरू कराव्यात, यामुळे प्रवाशांमधील रोष कमी होईल, अशी माहिती रेल यात्री परिषदचे सुभाष गुप्ता यांनी दिली.>राजकीय नेते गप्प का?एसी लोकलचे भाडे प्रथम दर्जापेक्षा जास्त आहे. येथे प्रथम दर्जाचे दर आवाक्यात नसताना एसी लोकलचा प्रवास हे स्वप्नच आहे. रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे फेºया वाढवण्याची मागणी नेते मंडळीदेखील करत असतात. मात्र एसी लोकलमुळे फेºया कमी केल्यानंतर एकही राजकीय नेता पुढे येण्यास तयार नाही. अथवा या विषयावर बोलण्यास तयार नाही. चर्चगेट-विरार फेºया कमी केल्यास प्रवाशांचा संताप उफाळून येईल हे निश्चित.- दिनेश जगताप, प्रवासी, विरार>विरार फेºया कमी न करता एसी लोकल चालवावाढत्या विस्तारीकरणामुळे मुंबईकर बोरीवलीच्या पुढे मोठ्या संख्येने गेला आहे. परिणामी विरार-चर्चगेट अशा फेºया वाढवण्याची गरज आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या फेºया कमी करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. एसी लोकलचे दर पाहता ही लोकल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे.एकंदरीत चर्चगेट-विरार फेºयाकमी न करता एसी लोकलचालवा.- विशाखा पाटील, प्रवासी, विरार>सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेवर लोकल सेवांचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यामुळे एसी लोकल चालवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गावरील फेºयांवर परिणाम होणार आहे. एसी लोकलही प्रवाशांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आली.- मुकुल जैन,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे>एसी लोकलचा प्रतिसाददिवस तिकीट प्रवासी उत्पन्न विनातिकीट दंडसंख्या२५ डिसेंबर ४५६ ७३६ ६८०१५ ०१ ४३५२६ डिसेंबर ३५४ २०९१ ९८९४० ११ ४१४५२७ डिसेंबर ३५० १११२ ७०८०१ ११ ३३९०
‘चर्चगेट-विरार ८ फे-या कमी करू नका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:21 AM