चर्नी रोड स्टेशन घेतले दत्तक !

By admin | Published: July 11, 2015 11:48 PM2015-07-11T23:48:00+5:302015-07-11T23:48:00+5:30

‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीमेचा भाग म्हणून विल्सन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चर्नीरोड रेल्वे स्थानक दत्तक घेतले. या मोहिमेच्या निमित्ताने

Churni road station adopted! | चर्नी रोड स्टेशन घेतले दत्तक !

चर्नी रोड स्टेशन घेतले दत्तक !

Next

मुंबई : ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीमेचा भाग म्हणून विल्सन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चर्नीरोड रेल्वे स्थानक दत्तक घेतले. या मोहिमेच्या निमित्ताने वर्षभर आठवड्यातून एक दिवस हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी करुन देण्याचा उद्देश आहे.
या अभियानात प्रामुख्याने प्राचार्यांसह सर्व शाखेतील विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. याच मोहिमेत सामान्य नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. विल्सन महाविद्यालयात अनेक प्राचार्य आणि विद्यार्थी चर्नीरोड स्थानकाहून प्रवास करतात. त्यामुळे या मोहिमेचा प्रारंभ चर्नीरोड स्थानकापासून केल्याचे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.आशिष उजगर यांनी सांगितले.
या संदर्भात विल्सन महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणाली की, एनसीसी युनिट आठवड्यातून एक दिवस येऊन स्टेशन स्वच्छ करण्याची जबाबदारी घेत आहे.

Web Title: Churni road station adopted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.