‘विल्सन’ने दत्तक घेतले चर्नी रोड स्थानक

By admin | Published: March 20, 2016 02:13 AM2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:37+5:30

विल्सन महाविद्यालयाने पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्नी रोड स्थानक स्वच्छतेसाठी दत्तक घेतले असून, गेले काही महिने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने

Churni Road Station, adopted by Wilson | ‘विल्सन’ने दत्तक घेतले चर्नी रोड स्थानक

‘विल्सन’ने दत्तक घेतले चर्नी रोड स्थानक

Next

मुंबई : विल्सन महाविद्यालयाने पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्नी रोड स्थानक स्वच्छतेसाठी दत्तक घेतले असून, गेले काही महिने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या कार्यकारी समन्वयक डॉ. कमल जाधव यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना दिली.
विल्सन महाविद्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून, त्यातून ‘स्वच्छ भारत अभियाना’ला अधिक चालना मिळेल, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले. जाधव यांच्या नेतृत्वाखाली विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना महाविद्यालयाच्या उपक्रमाची माहिती दिली.
काही महिन्यांपूर्वी राज्यपालांनी आपल्या भाषणातून विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना आपल्या नजीकचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक वा एखादे सार्वजनिक ठिकाण दत्तक घेऊन त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाविद्यालयाने चर्नी रोड स्टेशन स्वच्छतेसाठी दत्तक घेतले असल्याचे कमल जाधव यांनी राज्यपालांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Churni Road Station, adopted by Wilson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.