समिती अध्यक्षपदासाठी चुरस
By Admin | Published: March 10, 2017 04:33 AM2017-03-10T04:33:21+5:302017-03-10T04:33:21+5:30
भाजपाने हक्क सोडल्यामुळे वैधानिक व विशेष समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच चढाओढ सुरू झाली आहे. दावेदारांनी मोठ्या समितीचे अध्यक्षपद
मुंबई : भाजपाने हक्क सोडल्यामुळे वैधानिक व विशेष समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच चढाओढ सुरू झाली आहे. दावेदारांनी मोठ्या समितीचे अध्यक्षपद मिळण्यासाठी पक्षातील आपले राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र यापैकी महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
मुंबई महापालिकेतील कोणत्याही पदावर हक्क सांगणार नाही, असे भाजपाने जाहीर केले आहे. त्यामुळे संख्याबळ अधिक असलेल्या शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली असून सर्व वैधानिक व विशेष समित्यांवर शिवसेना नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. शुक्रवारी १० मार्चला स्थायी व शिक्षण समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. स्थायी समितीसाठी आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर आणि रमेश कोरगावकर यांच्यात चुरस आहे. तर शिक्षण समितीसाठी शीतल म्हात्रे व शुभदा गुडेकर यांच्यामध्ये चुरस असणार आहे. (प्रतिनिधी)
स्थायी समितीवर यांची वर्णी
स्थायी या महत्त्वाच्या समितीवर शिवसेनेकडून यशवंत जाधव, राजुल पटेल, रमेश कोरगावकर, चंगेझ मुलतानी, आशिष चेंबूरकर, संजय घाडी, सुजाता सामंत, समीक्षा सक्रे, सदा गजानन परब, मंगेश सातमकर, भाजपाकडून मनोज कोटक, अलका केरकर, शैलजा गिरकर, राजेश्री शिरवाडकर, प्रभाकर शिंदे, विद्यार्थी सिंह, अभिजित सावंत, मकरंद नार्वेकर, गीता गवळी, पराग शहा आदी तुल्यबळ सदस्य भाजपाने दिले आहेत. काँग्रेसकडून रवी राजा, आसिफ झकेरिया, कमल जहाँ सिद्दिकी, राष्ट्रवादीकडून राखी जाधव आणि सपाकडून रईस शेख यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
सुधार समितीत तीन माजी महापौर
स्थायीपाठोपाठ महत्त्वाच्या असलेल्या सुधार समितीवर चक्क तीन माजी महापौरांची वर्णी लागली आहे. श्रद्धा जाधव यांच्यासह विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या माजी महापौरांची सुधार समिती सदस्य म्हणून शिवसेनेने नियुक्ती केली आहे. पण यात किशोरी पेडणेकर यांचीही नियुक्ती झाल्यामुळे समिती अध्यक्षपदावर शिवसेनेच्या महिला आघाडीचा दावा असल्याचे समजते.
सुधार समितीतील सदस्य
शिवसेना - श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, रमाकांत
रहाटे, अनंत नर, स्वप्निल टेंबवलकर, किशोरी पेडणेकर, स्नेहल मोरे, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, किरण लांडगे.
भाजपा - उज्ज्वला मोडक, प्रकाश गंगाधरे, महादेव शिवगण, ज्योती अळवणी, शिवकुमार झा, सुनील यादव, सागरसिंह ठाकूर, योगीराज दाभाडकर, हरीश भांदिर्गे, जगदीश ओझा
काँग्रेस - विठ्ठल लोकरे, अश्रफ आझमी, जावेद जुनेजा
राष्ट्रवादी काँग्रेस -
ज्योती हारुन खान
समाजवादी पक्ष - अब्दुल कुरेशी
शिक्षण समितीसाठी या सदस्यांची निवड
शिवसेना - शीतल म्हात्रे, शुभदा गुडेकर, संध्या दोषी, स्नेहल आंबेकर, जितेंद्र पडवळ, चंद्रावती मोरे, प्रज्ञा भूतकर, सुमंती काते, अंजली नाईक (स्वीकृत सदस्य - राहुल नरे, साईनाथ दुर्गे)
भाजपा - आसावरी पाटील, राम बारोट, सुनीता यादव, त्रिवेदी, पोतदार, श्रीकला पिल्ले, अनिष मकवानी (स्वीकृत सदस्य : आरती पुगावकर)
काँग्रेस - विनी डिसोझा, राजपती यादव, संगीता हंडोरे (स्वीकृत सदस्य - सुरेश सिंह)
राष्ट्रवादी काँग्रेस - सईदा खान
बेस्ट समिती सदस्य -
शिवसेना - अनिल पाटणकर, अनिल कोकीळ, सुहास सामंत, कुसळे, हर्षल कारकर, प्रवीण शिंदे
भाजपा - अतुल शहा, कमलेश यादव, मुरजी पटेल, सुनील गणाचार्य, संजय (नाना)आंबोले, सरिता पाटील
काँग्रेस - रविराजा, भूषण पाटील
समित्यांच्या निवडणुकीची तारीख
शिक्षण समिती : १४ मार्च
स्थायी समिती : १४ मार्च
बेस्ट समिती : १४ मार्च
सुधार समिती : १६ मार्च
स्थापत्य समिती (शहर) : २३ मार्च
स्थापत्य समिती (उपनगरे) : २३ मार्च
सार्वजनिक आरोग्य समिती : २३ मार्च
बाजार व उद्यान समिती :
२४ मार्च
विधी समिती : २४ मार्च
महिला व बाल कल्याण : २४ मार्च