गिरगावात यंदा मिरवणुकांची ‘ठसन’

By admin | Published: March 20, 2015 12:34 AM2015-03-20T00:34:16+5:302015-03-20T00:34:16+5:30

मराठीबहुल असलेल्या गिरगावात गेल्या वर्षीपर्यंत गुढीपाडव्याची एकमेव मिरवणूक निघत असे. पण आता हे इतिहासजमा होणार आहे.

'Chusan' for chillies this year | गिरगावात यंदा मिरवणुकांची ‘ठसन’

गिरगावात यंदा मिरवणुकांची ‘ठसन’

Next

पूजा दामले ल्ल मुंबई
मराठीबहुल असलेल्या गिरगावात गेल्या वर्षीपर्यंत गुढीपाडव्याची एकमेव मिरवणूक निघत असे. पण आता हे इतिहासजमा होणार आहे. कारण गिरगावला वाढता राजकीय पाठिंबा मिळत असल्याने यंदा शिवसेनेनेदेखील मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे गिरगावात यंदा दोन मिरवणुका निघतील.
१२ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढणे सुरू केले. शिवसेनेचे कार्यकर्ते याच मिरवणुकीत सामील होत असत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने सायंकाळी स्वागतयात्रा काढली होती. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ती नंतर काढण्यात आली नाही. गेल्या वर्षी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मानापमान नाट्य चांगलेच रंगले होते. मधल्या काळात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेला गिरगावातून चांगली मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेला आता गिरगावात आपले स्थान पक्के करायचे आहे. विवेकानंद प्रतिष्ठानचा कल हा भाजपाकडे असल्याने आता शिवसेनेने स्वतंत्र मिरवणूक काढण्याचा इरादा पक्का केला आहे. किंबहुना त्यांची मिरवणुकीची जोरदार तयारी झाली असून त्यासाठी उद्धव ठाकरे गिरगावात येणार आहेत.
शिवसेनेची स्वागतयात्रा सकाळी साडेसात-आठच्या सुमारास आर्यन हायस्कूल येथून निघेल. तर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची स्वागतयात्रा सकाळी आठच्या सुमारास फडके गणपती मंदिर येथून निघणार आहे. शिवसेनेची यात्रा पुढे सरळ गिरगाव रोडवरून जाईल. तर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची स्वागतयात्रा पुढे येऊन गिरगाव रोडला येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या यात्रेच्या मागे युवा प्रतिष्ठानची यात्रा असणार आहे.
दोन्ही स्वागतयात्रांमध्ये ५५ ते ६० देखावे सहभागी होणार आहेत. वरकरणी एकच स्वागतयात्रा दिसणार असली, तरीही यात कुठेही राजकारण आणणार नसल्याचे सांगत असताना सर्व राजकारणाचाच भाग असल्याचे दिसून येत आहे.
सध्या विवेकानंद प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्यामध्ये फारसे मतभेद नाहीत. या दोघांनी एका समन्वय समितीची स्थापना केली आहे. पण राजकीय वर्चस्व वाढवण्याच्याच इराद्याने शिवसेना मैदानात उतरली, हे स्पष्टच आहे.
आमच्यात मतभेद नाहीत. पण काही गोष्टी वेगळ्या असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दुसरा कोणताही हेतू नाही, असे समन्वय समितीतर्फे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला गिरगावात
शिवसेना काढत असलेली स्वागतयात्रा ठाकूरद्वारच्या नाक्यावर आल्यावर तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गिरगावकरांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते पुढे यात्रेत सहभागी होणार असून चिराबाजार येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन करणार आहेत.

ढोलपथकांमध्येरंगणार चुरस
विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत गिरगाव ध्वज पथक, मोरया आणि गजर ही ढोलपथके सामील होतील. तर शिवसेनेच्या मिरवणुकीत जगदंब ढोल पथकाचा समावेश असेल. जगदंबला साथ देण्यासाठी शिवसेनेने कुलाब्याचे माउली आणि दहिसरच्या जल्लोष या ढोलपथकांनाही पाचारण केले आहे.

त्यामुळे ढोलपथकांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे. विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीच्या सुरुवातीला मादुस्करांचा वभवसंपन्न गणपती असेल, तर शिवसेनेच्या मिरवणुकीत गिरगावचा महाराजा स्थानापन्न झालेला दिसणार आहे.

च्शहर आणि उपनगरात गुढीपाडव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सोशल नेटवर्किंग साइट्सवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही व्हर्च्युअल गुढीपाडव्याची धूम दिसून येते आहे. फेसबूक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही गुढीपाडव्याचा रंग चढू लागला आहे. त्यामुळे आता इतर सणांप्रमाणेच सोशल नेटवर्किंग साइ्टसवरही हायटेक गुढीपाडवा जल्लोषात साजरा होणार यात शंका नाही.

च्गुढीपाडवा समीप आल्याने व्हॉट्सअ‍ॅप डीपीज् आणि स्टेट्सवरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. ढोलताशा पथकांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाईने सरावाचे फोटोज् डीपीज् म्हणून अपडेट केले आहेत; तर काही पथकप्रमुखांनीही ‘भाव’ खात ढोलताशा पथकांचा सराव घेतानाचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.

च्शोभायात्रांच्या हटके अशा आकर्षक असलेल्या निमंत्रण पत्रिकाही व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल साइट्सवर शेअर होत आहेत. शिवाय, गेल्या काही वर्षांत ‘फेस्टिव्ह’ फॅशन म्हणून फेमस झालेले काही ट्रेंड्स व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर होत आहेत. त्यात मग टॅटू, चंद्रकोर, भीकबाळी या सगळ्यांची चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. तसेच गेल्या २-३ वर्षांत शहर आणि उपनगरात ढोलताशा पथक , मंडळे असो वा युथ ग्रुप्स यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्वांचेच नाव आणि आकर्षक लोगोज्ही चर्चेत आहेत. ही नावेही सध्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीज् आणि स्टेटसमध्ये दिसून येत आहेत. शिवाय, गुढीपाडव्याच्या दिवशी एकाच विभागातील दोन पथकांमध्ये दिसून येणारा रोषही व्हॉट्सअ‍ॅपवर दिसून येतो आहे.

यंदा मराठमोळ्या फॅशन्सचा साज
उगवत्या सूर्याच्या किरणांनी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणाई सज्ज झाली आहे. शनिवारी, २१ मार्च रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी वेशभूषा कोणती करायची, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. तरुणी व महिलावर्गात नऊवारी साडीला पसंती आहे. तर पुरुष मंडळी सदरा व कोटी घालून शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.

पारंपरिक वेशभूषा करण्याबरोबरच ती हटके असावी, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. प्रत्येकीलाच नऊवारी साडी नेसायला जमत नाही. म्हणून रेडिमेड नऊवारी साड्या नेसण्याकडे बऱ्याच जणींचा कल आहे. यातही हटके प्रकार आणत काही फॅशन डिझायनर्सनी काष्टा पँट तयार केली आहे. या पॅँट घालायला सोप्या व ट्रेण्डीसुद्धा दिसतात. पँटवर पदरासारखी ओढणी घ्यायची जेणेकरून संपूर्ण नऊवारी साडीचा लूक येतो.

मोठ्ठं कुंकू, चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, गळ्यात मोत्याची चिंचपेटी, तनमणी, ठुशी, बोरमाळ, कानांत मोत्यांचे झुमके, कुड्या, हातात तोडे, बाजुबंद, मेखला असा साज करणार आहेत. पुरुषांचा फेटा, गांधी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा वेश असेल. शिवाय ‘खण’प्रकारातील साड्या सध्या इन आहेत. यासाठी काहींनी जुन्या साड्यांपासून ड्रेस, कुर्ता करण्याकडेही धडपड केली आहे. खणापासून तयार गळ्यातला हार, खणाची चप्पल, पर्स वापरावर भर दिला जात आहे.

 

Web Title: 'Chusan' for chillies this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.