Join us

सीआयडीने ‘त्या’ महिलेचा जबाब नोंदवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

परमबीर सिंग खंडणीप्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि एनआयएच्या कोठडीत असलेले ...

परमबीर सिंग खंडणीप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि एनआयएच्या कोठडीत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याविरूद्ध गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) करीत असलेल्या चौकशीमध्ये सोमवारी एका महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. पती अनिल सिंग या दोघांसाठी पैसे वसुली व मध्यस्थीचे काम करीत असल्याचा आरोप तिने केला आहे.

पश्चिम उपनगरात राहात असलेल्या गुंजन अनिल सिंग हिने पती व सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल सिंग हा परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याचे सांगत असे. त्याच्यासाठी तो पैसे गोळा करीत असे, २०१८मध्ये ठाण्यातील एका गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी एका अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावून कोट्यवधी रुपये घेतले होते, त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने आपल्याला मारण्याची धमकी दिली होती, याबद्दल अनिल सिंग याची चौकशी करण्याची मागणी तिने केली आहे. तशी एनआयएला त्याच्याबद्दल तक्रार दिली असल्याचे तिने सीआयडीला दिलेल्या जबाबात नमूद केल्याचे समजते.