कामोठे : नवीन पनवेल येथील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या धारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पूल सिडकोने पुन्हा गुरुवारी तोडून टाकला. त्याचबरोबर आजू बाजूच्या अनधिकृत हातगाड्यावरही सिडकोने कारवाई केली.नवीन पनवेल येथील मशितच्या बाजूला सिडकोचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्या अगामी काळात त्रासदायक ठरणार असल्याचे पाहुन सिडकोने त्यांच्याविरोधात मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात सिडकोने संबंधित झोपडपट्टीत जाण्यासाठी नाल्यावर टाकण्यात आलेल्या पूल तोडला होता. मात्र सिडकोने पाठ फिरवताच या ठिकाणी पुन्हा पूल उभारण्यात आला.त्यामुळे प्रशासनाने पुन्हा मोहिम हाती घेवून संबंधित पूल तोडून टाकले. सिडकोचे बांधकाम नियंत्रक बी. डी. काकड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोहिमेत ३० कर्मचारी, १ ट्रक, १ जेसीबी, २ गॅस कटर यांचा समावेश होता. या कारवाईला झोपडपट्टी धारकांनी विरोध केला. मात्र पोलिसांनी हा विरोध मोडून काढला. यावेळी अनधिकृतपणे उभ्या करणाऱ्या फळांच्या हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली.
सिडकोने अनधिकृत पूल तोडला
By admin | Published: September 12, 2014 12:55 AM