Join us

कांजूरमार्ग येथे सिडको उभारणार २ हजार खाटांचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिडकोच्या वतीने कांजूरमार्ग येथे २ हजार खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या कोविड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिडकोच्या वतीने कांजूरमार्ग येथे २ हजार खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये १,४०० ऑक्सिजन खाटा, ४०० ऑक्सिजन खाटा व २०० आयसीयू खाटा असणार आहेत. यासाठी अंदाजे ५२ लाख खर्च येणार आहे. या जलद गतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी सिडको नुकत्याच निविदा मागविल्या होत्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे, तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. यासाठी सरकार ठिकठिकाणी कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईत असलेले बहुतांश कोविड केअर सेंटर एमएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आले आहेत. कांजूरमार्ग पूर्व येथे सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या कोविड सेंटरमुळे महानगरपालिका व एमएमआरडीएच्या कोविड सेंटरवरील भार कमी होऊ शकतो, तसेच पूर्व उपनगरातील कोरोनाबाधित रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो.