Join us  

सिडकोची ‘साउथ नवी मुंबई’

By admin | Published: December 03, 2015 3:39 AM

सिडको देशातील पहिल्या स्मार्ट सिटीची उभारणी करणार आहे. यामध्ये पनवेल, खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली, कामोठे, तळोजा व पुष्पकनगरचा समावेश

नवी मुंबई : सिडको देशातील पहिल्या स्मार्ट सिटीची उभारणी करणार आहे. यामध्ये पनवेल, खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली, कामोठे, तळोजा व पुष्पकनगरचा समावेश असणार असून, हा परिसर दक्षिण नवी मुंबई म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी ३४ हजार ७७७ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, दहा प्रमुख मुद्द्यांवर आधारित ८८ उपप्रकल्पांचा समावेश असणार आहे. सिडकोने स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वाशीतील सिडको प्रदर्शनीय केंद्रामध्ये स्मार्ट सिटीचा शुभारंभ होणार असल्याची माहिती, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सिडकोने नवी मुंबईची निर्मिती करून, या शहरात उद्याने, आरोग्य व्यवस्था, दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विकसित उत्तर नोड नवी मुंबई महापालिका म्हणून ओळखला जात आहे. दक्षिण नोडमधील पनवेल, खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली, कामोठे, तळोजा या सात नोडचा स्मार्ट सिटीमध्ये सहभाग होणार आहे. दक्षिण नवी मुंबईच्या या विकासामध्ये शासनाचा कोणताही निधी घेतला जाणार नाही. १० मुद्द्यांवर आधारित ८८ उपप्रकल्प असणार असून, तब्बल ३४,७७७ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. स्मार्ट सिटी कशी असेल, याची माहिती नागरिकांना मिळावी, या साठी ४ व ५ डिसेंबरला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये जवळपास ५० स्टॉल्स असणार आहेत. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटीसाठीचे १० मुद्दे व ८८ उपप्रकल्पमुख्य मद्देउप प्रकल्पगुंतवणूकस्मार्ट संस्था९२१९.५०पारदर्शकता, ई-प्रशासन २११७०.४पर्यावरणसंपन्नता ९ ४१८स्वच्छता प्रकल्प७३७८.७५उद्याने, क्रीडांगणे व इतर ९६३५सर्वसमावेशक नियोजन ६२११. ८५गृहनिर्माण प्रकल्प११०७००रस्ते,पाणी, वीज१५७४८४. २६मेट्रो रेल्वे व इतर१०१३०६०जेएनपीटी विस्तारीकरण व इतर११५००एकूण८८३४७७७.४० गुंतवणूक कोटीमध्येयेणाऱ्या चार ते पाच वर्षांमध्ये या परिसरात ५० हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असून, जवळपास ९ लाख नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.पत्रकार परिषदेमध्ये व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण, के. के. वरखेडकर उपस्थित होते.