Join us

सुरेश देशमाने यांना सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना न्यूयॉर्क येथील ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान प्राप्त ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना न्यूयॉर्क येथील ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान प्राप्त झाला आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे दिग्दर्शित ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटासाठी सुरेश देशमाने यांनी केलेल्या सिनेमॅटोग्राफीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

२४ वा ब्रुकलीन चित्रपट महोत्सव ४ ते १३ जून या कालावधीत विंड मिल स्टुडिओ येथे पार पडला. जगातील ९३ देशांतील अडीच हजार चित्रपटांमधून ‘नॅरेटिव्ह फिचर फिल्म’ विभागात १३ चित्रपटांची निवड करण्यात आली होती आणि त्यात ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटाचा समावेश होता. सिनेमॅटोग्राफीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. अंतिम फेरीत सुरेश देशमाने यांच्यासह हॉलिवूडचे ८ आणि ब्राझीलचे ४ आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले सिनेमॅटोग्राफर स्पर्धेत होते. प्रख्यात कथालेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------