Join us

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अवतरले सिनेस्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 20:49 IST

सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला प्रचार.

संजय घावरे, मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात सध्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचारसभांसोबतच रॅलींना जोर लावला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या हिंदी-मराठीतील कलाकारांना पाहण्यासाठी उन्हाची पर्वा न करता सर्वसामान्यांनी गर्दी केली होती.

सुधीर मुनगंटीवार यांनी मनोरंजन विश्वातील कलाकारांना प्रचार रॅलीमध्ये उतरवत निडवणूकीला ग्लॅमर टच दिला आहे. सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड या मनोरंजन विश्वातील नामवंत कलाकारांनी चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वनी विधानसभा मतदारसंघात रवीनाने प्रचार केला. सुनील शेट्टीच्या उपस्थितीमुळे भद्रावती आणि वरोरमध्ये उपस्थित राहून मतदारांना आकर्षित केले. प्राजक्ता माळीने वनी-आर्मी भागात, तर आणि निशीगंधा वाड यांनी मूल व पोंभूणा भागात मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार करत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी काढण्यात आलेल्या रोड शोमधील रुपेरी पडद्यावरील चेहरे पाहण्यासाठी तूफान गर्दी झाली होती. या रॅलीमध्ये मुनगंटीवार यांच्यावर फोकस राहिला. सुनील आणि रवीना यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी खेचली.

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार