Join us

CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचणीसाठी ‘सिप्ला’ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:54 AM

‘सिप्लेंझा’ या नावाने नजिकच्या भविष्यात उपलब्ध करून देण्याबाबत कंपनी प्रयत्नरत असून तिला याकामी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाचे सहकार्य लाभत आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठीची लस प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी सिप्ला या दशातील नामांकित कंपनीने नियामक यंत्रणेकडे परवानगी मागितली आहे. फेविपिरावीर या औषधाची सिप्लाकृत आवृत्ती ‘सिप्लेंझा’ या नावाने नजिकच्या भविष्यात उपलब्ध करून देण्याबाबत कंपनी प्रयत्नरत असून तिला याकामी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या दुसऱ्या भारतीय कंपनीने आपल्या विषाणूनिरोधक लसीची चाचणी घेण्यासाटी भारतीय औषध महानियंत्रकांच्या कार्यालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याचे जाहीर केले आहे. संसर्गाची अल्प व साधारण व्याप्ती असलेल्या रुग्णांवर ही चाचणी घेतली जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या