ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईत बसणार सर्किट बेंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:48 AM2017-11-06T04:48:27+5:302017-11-06T04:48:27+5:30

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवार, ६ नाव्हेंबरपासून नॅशनल कन्झ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन (एनसीडीआरसी) मुंबईत येत आहे.

Circuit Benches sitting in Mumbai to solve the problem of customers | ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईत बसणार सर्किट बेंच

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईत बसणार सर्किट बेंच

Next

मुंबई : ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवार, ६ नाव्हेंबरपासून नॅशनल कन्झ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन (एनसीडीआरसी) मुंबईत येत आहे. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एनसीडीआरसीतर्फे सर्किट खंडपीठ बसणार आहे.
ग्राहकांना काही हक्क आहेत, तसेच त्यांची कर्तव्यदेखील आहेत. अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्यावरही ग्राहक गप्प बसतात. ग्राहकांनी न्याय मागितला पाहिजे. बहुतांश वेळा मुंबईसह राज्यातील अनेक ग्राहकांच्या समस्या सुटत नाहीत. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी एनसीडीआरसीतर्फे ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खंडपीठ बसणार आहे. ६ ते १० नाव्हेंबर या दिवशी खंडपीठ बसणार आहे. ग्राहकांनी येथे तक्रारींची नोंद केल्यास, त्यांना लवकर न्याय मिळू शकतो. अधिकाधिक ग्राहकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार दिवस बसणाºया खंडपीठासमोर ग्राहकांना तक्रारी दाखल करणे शक्य न झाल्यास, नंतरही ते तक्रारी दाखल करू शकतात. ग्राहक नवी इमारत, एफ ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली - ११००२३ या पत्त्यावर तक्रार नोंदविता येऊ शकते, असे एनसीडीआरसीने स्पष्ट केले आहे, तसेच ग्राहक कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या १८००२२२२६२ टोल फ्री क्रमांकावर तक्रारी दाखल करू शकतात.

Web Title: Circuit Benches sitting in Mumbai to solve the problem of customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.