सिटीजन.....
By Admin | Published: September 2, 2014 10:39 PM2014-09-02T22:39:46+5:302014-09-02T22:39:46+5:30
>सिटीजनपाळीव कुत्र्यांच्या विष्ठेमुळे परिसरात दुर्गंधीघराघरात कुत्रे पाळणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या व्यस्त आणि व्यग्र दिनक्रमात तसेच सुरक्षेेसाठी घरामध्ये कुत्रा पाळणे हा मोठा मानसिक आधार असतो. परंतु या प्राण्यांच्या माध्यमातून म्हणजेच कुत्र्यांच्या विष्ठेतून, मलमुत्रातून अनेक घातक रोग पसरतात. पाळीव कुत्र्याला विरंगुळा मिळावा म्हणून त्यांना मोकळ्या हवामानात फिरायला आणणारे त्यांचे मालक पादचारी रस्त्यावरच कुत्र्यांना नैसर्गिक विधी करण्यास भाग पाडतात. परिणामी पादचारी विष्ठेवरच पाय देऊन पुढे जातो. ती विष्ठा रस्त्यावर पसरून विविध विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नागरिकांना अनेक रोग होण्याची शक्यता आहे. पाळीव कुत्रा फिरवणार्या मालकांनी रस्त्याच्या कडेला कुत्र्यांना घेऊन जाऊन नैसर्गिक विधी पार पाडला, तर नागरिकांच्या पायाला विष्ठा लागणार नाही आणि दुर्गंधीसुद्धा पसरणार नाही. पाळीव कुत्रे पाळणार्या नागरिकांनी सावधगिरी बाळगली तर नागरिकांचे रोगराईपासून संरक्षण होईल. - शिवदास शिरोडकर, लालबाग