Join us

सिटीजन.....

By admin | Published: September 12, 2014 10:38 PM

सिटीजन.....

सिटीजन.....

गरीब वस्त्यासुद्धा स्वच्छ व्हाव्यात !

मुंबईतील कामगार विभाग डिलाईल रोड येथे ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या बी.डी.डी चाळीत बरेचसे दारिद्र्य रेषेखालील रहिवाशी राहतात. या वसाहती खूप जुन्या आहेत पण त्यांची डागडुजीसुद्धा होत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांंवर कायमच अपघाताची टांगती तलवार असते. तसेच इमारतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यांवर कचर्‍याचा ढिग पडलेला असतो व तो वेळोवेळी न उचलल्यामुळे हा कचरा सडून असह्य दुर्गंधी व रोगराई पसरते. त्यामुळे गरीब रहिवाशांना नाहक खर्च करण्याची वेळ येते. या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक रहिवाशी संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी नोंदवतात, पण या यंत्रणांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कदाचित ही वस्ती गरीबांची असल्यामुळे संबंधित यंत्रणांना ही बाब महत्त्वाची वाटत नसावी. अद्यापपर्यंत रहिवाशांनी संयम राखून हा त्रास सहन केला आहे. या रहिवाश्यांचा संयम संपल्यास रहिवाशी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनाने रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी भावना आता व्यक्त होत आहे.
- उदय राणे, लालबाग