अफगाणिस्तानातील नागरिकांना धार्मिक भेदभाव न करता भारतात आश्रय द्यावा -तिस्ता सेटलवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:08 AM2021-08-24T04:08:33+5:302021-08-24T04:08:33+5:30
मुंबई : अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते नागरिक इतर देशांत आश्रय ...
मुंबई : अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते नागरिक इतर देशांत आश्रय घेत आहेत. अशा बिकट परिस्थितीत सर्वांनी अफगाणिस्तानातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय देण्याची नितांत गरज, असे मत सबरंग इंडियाचे तिस्ता सेटलवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सेटलवाड म्हणाल्या की, अफगाणिस्तानमध्ये सध्या अत्यंत विदारक आणि अवघ्या मानवतेची हत्या करणारी परिस्थिती उद्भवलेली आहे. आधी रशिया आणि नंतर अमेरिकापूर्वी रशिया आणि अलीकडे अमेरिका अशा बलाढ्य राष्ट्रांचा वसाहतवाद आणि तालिबानी मूलतत्त्ववाद याच्या जीवघेण्या कात्रीत सामान्य अफगाण स्त्री, पुरुष आणि बालके सापडलेली असून त्यांच्यावर आलेल्या या महा आपत्तीच्या वेळी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय दिला पाहिजे. बलाढ्य राष्ट्रांचा साम्राज्यवाद आणि तालिबानी मूलतत्त्ववाद यांच्या जीवघेण्या कात्रीत अफगाणिस्तानामधील सर्वसामान्य स्त्री पुरुष आणि लहान मुले-मुली सापडलेली आहेत. अशा बिकट आपतीच्या वेळी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय द्यावा.
एक लाख निष्पाप बळी
अमेरिकेतील ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकाचे सैनिक अफगाणिस्तानातील तालिबांचा खात्मा करण्यासाठी तब्बल २० वर्षे ठाणे मांडू होते. मात्र, अमिरिकेने या २० वर्षांत फक्त अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सुरक्षेचा आव आणला. मात्र, अफगाणिस्तानमध्ये कधीच शिक्षण आणि आरोग्यावर भर न देता मोठ्या प्रमाणात अमेरिकेने शस्त्रसाठ्यावर खर्च केलेला आहे. ४ कोटींची लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिकेच्या सैनिकामधील चकमकीत आजपर्यंत एक लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून अफगाणिस्तानातील जनतेला भारताकडून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे, असे तिस्ता सेटलवाड म्हणाल्या.