मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जर नागरिक जागरूक आणि प्रशासन यांच्यात समन्वय असेल तर नागरी समस्या सुटू शकतात याचे चित्र आज गोरेगावात दिसले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल अचानक रेल्वे बरोबरचे सफाई कंत्राटदाराच कंत्राट संपुष्टात आलं व आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. जोगेश्वरी ते दहिसर या स्थानकांच्या साफसफाईचा प्रश्न निर्माण झाला होता.सदर बाब गोरेगाव प्रवासी नागरिक संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांच्या लक्षात आली.त्यांनी गोरेगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर रवीचंद्रन आणि रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा केला.
रेल्वे प्रशासनाने स्टेशन मस्तारला मदत करत पूल सफाई व फलाट सफाईची सोय केली. त्यांनी प्लॅटफॉर्म व गोरेगाव स्थानक परिसरातील साफ केला. यावेळी सुमारे तीस गोणी कचरा निघाला? तो स्थानक परिसरात ठेवणे शक्य नव्हते.चितळे यांनी पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांच्याशी संपर्क साधून सदर कचरा उचलण्याची विनंती केली आणि त्यांनी मोलाचे सहकार्य केले.चितळे यांनी पी दक्षिण घ.क.व्य चे सहाय्यक अभियंता तुषार पिंपळे यांना विनंती करुन परिस्थिती कथन केली.त्यांनी मोलाचे सहकार्य करत येथील सर्व तीन गोणी कचरा उचलण्याची व्यवस्था केली व आणि स्वच्छता मोहीमच पार पाडली.
सध्या आम्हाला रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या स्थानकातून सफाई कामगार दिले असून लवकरच आम्हाला नियमित सफाई कामगार मिळतील अशी माहिती रवीचंद्रन यांनी दिली नागरिक व प्रशासन मिळून प्रश्न सोडवू शकतात याचे हे ताजे उदाहरण असल्याचे चितळे यांनी लोकमतला सांगितले.