पावसाच्या हजेरीने नागरिक सुखावले

By admin | Published: June 13, 2014 11:19 PM2014-06-13T23:19:26+5:302014-06-13T23:19:26+5:30

कधी येणार काधी येणार अशी प्रतिक्षा करायला लावणारा पाऊस मध्यरात्री दाखल झाला आणि शेतकरी - बागायतदार यांच्यासह उष्म्याने हैराण झालेले नागरिक सुखावले

Citizens are well aware of the presence of rain | पावसाच्या हजेरीने नागरिक सुखावले

पावसाच्या हजेरीने नागरिक सुखावले

Next

रेवदंडा : कधी येणार काधी येणार अशी प्रतिक्षा करायला लावणारा पाऊस मध्यरात्री दाखल झाला आणि शेतकरी - बागायतदार यांच्यासह उष्म्याने हैराण झालेले नागरिक सुखावले. मात्र पावसाने मध्यरात्री हजेरी लावल्याने पहिल्या पावसात भिजण्याचा नागरिकांचा आनंद हुकला.
सर्वच रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी डबकी तयार झाली. सकाळपासूनच घरे शाकारणी करणाऱ्या कारागिरांची शोधाशोध सर्वत्र दिसू लागली. छत्र्या, रेनकोट, पावसाळी पादत्राणे खरेदी करणारा वर्ग बाजारात दिसत होता. वीज मात्र गायब झाल्याने पहिल्या पावसात सुखावलेले नागरिक वीज वितरण कंपनी पर्जन्यवृष्टीत लपंडाव करणार की काय अशी चर्चा नागरिकांच्या रंगली असताना सुखावलेल्या बळीराजाने शेतावर धाव घेतलेली दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Citizens are well aware of the presence of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.