Join us

नागरिक करू शकणार नालेसफाईची पोलखोल, तक्रार करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:58 AM

नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत आहे. मात्र ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे.

मुंबई : नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत आहे. मात्र ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. MCGM 24x7 या अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपमध्ये नालेसफाई करण्यापूर्वीची व झाल्यानंतरची छायाचित्रे तारीख व वेळेसह ‘अपलोड’ करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळा असल्यास नागरिक त्यांच्या अ‍ॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीद्वारे सध्याचे छायाचित्र ‘अपलोड’ करुन ही विसंगती निदर्शनास आणू शकणार आहेत.मोठ्या नाल्यांच्या ४६७ तर छोट्या नाल्यांच्या ७९० भागांची छायाचित्रे विभागनिहाय पद्धतीने देण्यात आली आहे. हे ‘अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप’ गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे़यामध्ये नालेसफाई विषयक ‘डिसिल्टींग’ हे मोड्यूल नव्यानेच विकसित करण्यात आले आहे. यानुसार सुधारित करण्यात आलेले हे अ‍ॅप सध्या केवळ ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ भ्रमणध्वनीमध्ये उपलब्ध असून लवकरच ते ‘आयओएस’ प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करुन दिले जाणार आहे.नागरिकांनी नालेसफाईची सत्य परिस्थिती दर्शविणारे सध्याचे छायाचित्र अपलोड केल्यास ती तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे आॅनलाईन पद्धतीनेच थेट जाणार आहे. तक्रारदारास त्यावर केलेल्या कारवाईची माहिती देणे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.अशी करा तक्रार...‘अ‍ॅन्ड्रॉईड’ भ्रमणध्वनीमध्ये असणारे ‘गुगल प्ले’ हे अ‍ॅप उघडावे. यामध्ये MCGM 24x7 हे अ‍ॅप शोधून ते ‘इन्स्टॉल’ करावे व त्यानंतर नोंदणी करावी. या अ‍ॅपच्या ‘होमस्क्रीन’वर ‘डिसिल्टींग’ मोड्यूल आहे. यामध्ये महापालिकेच्या २४ विभागांमध्ये असणारे नाले किंवा त्यांचे भाग इत्यादी तपशिल आहे. तपशिल उघडल्यावर त्यात सर्वात शेवटी नालेसफाईपूवीर्ची व नालेसफाई झाल्यानंतरची छायाचित्रे बघण्यासाठी व्ह्यूव हा पर्याय निवडावा.या पर्यायातंर्गत असणारे छायाचित्र व सध्याची परिस्थिती यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्यास त्याच पानावर सर्वात शेवटी  पर्याय निवडावा. त्यानंतर उघडणाºया पानावर तक्रार नमूद करता येणार असून तक्रारीसह सद्यस्थिती मांडणारे छायाचित्र ’अपलोड’ करता येणार आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका