मुंबई : बोरीवली (पूर्व) येथील राजेंद्र नगर परिसरातील विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी एक व्यासपीठ म्हणून अ लीडर्स फाउंडेशनची स्थापना केली असून यात सर्वपक्षीय कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.या विभागातील विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेतच. त्यांना साहाय्यभूत ठरण्यासाठी ही सामाजिक चळवळ उभी करण्यात आली आहे. या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासोबत फाउंडेशन समन्वयाचे काम करील. राजेंद्र नगर परिसरातील प्रलंबित अथवा अपूर्ण विकासकामांना गती देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे साहाय्य घेतले जाणार असल्याचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी सांगितले.रविवारी झालेल्या या संघटनेच्या बैठकीला पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी विभागातील पार्किंग समस्या, गतिरोधक बसवणे, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवरील कारवाई, बीट चौकी उभारणे, शेअर रिक्षा आणि बस वाहतूक यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाºयांकडून देण्यात आले.या वेळी गोल्डन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेश झा, सुधीर परांजपे, कुणाल माईणकर, सचिन पवार, किशोर उन्हेलकर, व्यंकटेश क्यासाराम, जयेश देसाई, गणेश ढगे, अॅड. अनिकेत भोसले, अॅड़़ विकी शर्मा, अमर मिसाळ, अनिल मोरे, हसमुख मकवाना, योगेश चंपानेरकर, सुशील जाधव, सुधीर कदम तसेच अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
विकासकामांसाठी राजेंद्र नगरात नागरिकांचे व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:59 AM