प्रामाणिक करदात्यांसाठी पालिकेकडून सवलत, करातूनही ‘बचत’ करण्याची नागरिकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:20 AM2018-04-18T01:20:26+5:302018-04-18T01:20:26+5:30

मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर, मुंबई महापालिकेने प्रामाणिक करदात्यांसाठी सवलत योजना आणली आहे. त्यानुसार, आगाऊ व विनाविलंब मालमत्ता कर भरणाºया ग्राहकांना त्यावर २ ते ४ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना मालमत्ता करातूनही बचत करता येणार आहे.

 Citizens have the opportunity to 'save' tax from the corporation for honest taxpayers and also 'save' them | प्रामाणिक करदात्यांसाठी पालिकेकडून सवलत, करातूनही ‘बचत’ करण्याची नागरिकांना संधी

प्रामाणिक करदात्यांसाठी पालिकेकडून सवलत, करातूनही ‘बचत’ करण्याची नागरिकांना संधी

Next

मुंबई : मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर, मुंबई महापालिकेने प्रामाणिक करदात्यांसाठी सवलत योजना आणली आहे. त्यानुसार, आगाऊ व विनाविलंब मालमत्ता कर भरणाºया ग्राहकांना त्यावर २ ते ४ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना मालमत्ता करातूनही बचत करता येणार आहे.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थापन अभियांनतर्गत (जेएनएनयूआरएम) सुचविण्यात आलेल्या सुधारणांपैकी प्रमाणिक व तत्काळ कर भरणाºया करदात्यांना काही प्रमाणात सूट देण्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार, अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आली. दरवर्षी या योजनेचा लाभ प्रामाणिक करदात्यांना घेता येतो. गेल्या वर्षी १ लाख ८ हजार ९९ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत, ६८५ कोटी १४ लाख रुपये मालमत्ता कराची रक्कम भरली. यामध्ये १५ कोटी ४८ लाख रुपयांची सवलत ग्राहकांना देण्यात आली
होती.

अशी आहे सवलत...
३० जून २०१८ पर्यंत किंवा त्यापूर्वी मालमत्ता कराची रक्कम भरल्यास, एप्रिल ते सप्टेंबर २०१८च्या मालमत्ता कराच्या बिलावर २ टक्के, तर आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९च्या मालमत्ता कराच्या बिलावर ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. जुलै २०१८ पर्यंत मालमत्ता कराचा भरणा या कालावधीकरिता केल्यास, अनुक्रमे १ व ३ टक्के सवलत दिली जाणार आहे.

आकडेवारी सांगते...
वर्ष २०१५- १६ २०१६-१७ २०१७-१८
मालमत्ताधारक ७५,६५१ ८९,००० १,०८,०९९
जमा केलेली रक्कम ४३९.०७ १000 ६८५.१४
सवलतीची रक्कम ८.00 ११.८० १५.४८
रक्कम कोटीमध्ये

Web Title:  Citizens have the opportunity to 'save' tax from the corporation for honest taxpayers and also 'save' them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.