अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:32 AM2019-01-21T04:32:53+5:302019-01-21T04:32:55+5:30
महापालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस जेव्हा दाद देत नाहीत तेव्हा नागरिकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो.
मुंबई : महापालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस जेव्हा दाद देत नाहीत तेव्हा नागरिकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. दादरच्या सेनापती बापट मार्गावरील नागरिकांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात एकजुटीने रस्त्यावर उतरून त्याचा प्रत्यय दिला. दादरच्या सेनापती बापट मार्गावर रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे आणि ते करत असलेल्या कचºयामुळे येथे राहणाºया स्थानिक नागरिकांना त्रास होतो. या फेरीवाल्यांविरोधात पालिका आणि पोलिसांत तक्रार करूनही कारवाई होत नाही. यावर त्रस्त झालेल्या नागरिकांनी रविवारी एकत्र येत स्वत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांनी या फेरीवाल्यांना रस्त्यावर अनधिकृतपणे गाड्या लावून धंदा करण्यास मज्जाव करत तत्काळ जागा सोडण्यास सांगितले. या दरम्यान फेरीवाले आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या नागरिकांना शांत करत तात्काळ फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू असे आश्वासन दिले.