मालाड-मालवणीतील नागरिकांची ट्राफिकमधून होणार सुटका, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपूलाला मान्यता
By मनोहर कुंभेजकर | Published: May 5, 2023 06:06 PM2023-05-05T18:06:07+5:302023-05-05T18:08:05+5:30
ट्राफिकमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
मुंबई : लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपुलास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (एमसीझेडएमएसाची) मान्यता मिळाल्याने उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मालाड, लिंक रोडहून मालवणी येथे वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंक रोड विशेषत: मिठ चौकी सिग्नल वरील ट्राफिकमुळे तासन-तास ताटकळत रहावे लागत असल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. ट्राफिकमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
या उड्डाणपुलामुळे लिंक रोड ते मालवणी अशी थेड जोडणी मिळणार असल्याने लिंक रोडवरील वाहतूकीचा ताण कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळही वाचणार आहे.३८० मिटर लांबीचा आणि ३६.०६ मिटर रुंदीचा हा पूल असणार आहे.
या उड्डाणपुलामुळे लिंक रोड ते मालवणी अशी थेड जोडणी मिळणार असल्याने लिंक रोडवरील वाहतूकीचा ताण कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळही वाचणार आहे.३८० मिटर लांबीचा आणि ३६.०६ मिटर रुंदीचा हा पूल असणार आहे.